एक्स्प्लोर

Shani Jayanti 2024 : आज शनी जयंती! आजच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका; शनी देईल कर्माचं फळ, एकामागोमाग येतील संकटं

Shani Jayanti 2024 : शनि जयंती लवकरच साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी खास आहे. पण शनी जयंतीच्या दिवशी केलेल्या चुका शनिदेवाला खूप कोपवू शकतात.

Shani Jayanti 2024 : शनिला (Shani Dev) सूर्यदेवाचा पुत्र म्हटलं जातं. येत्या 8 मे रोजी शनि जयंती (Shani Jayanti) देशभरात साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मीयांसाठी हा अतिशय खास दिवस आहे. आपल्यावरील आलेलं संकट कमी करण्यासाठी तसेच साडेसाती दूर करण्यासाठी या दिवशी शनिदेवाची विधीवत पूजा केली जाते. तसेच, शनि पिडा दूर करण्यासाठी काही उपाय देखील करणं गरजेचं आहे.

शनि जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. काही राज्यांमध्ये शनि जयंती वैशाख अमावस्येला साजरी होते तर काही राज्यांमध्ये ती ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. यावर्षी वैशाख अमावस्या 8 मे रोजी आणि ज्येष्ठ अमावस्या 6 जून रोजी आहे. त्यामुळे या दोन दिवशी शनि जयंती साजरी होणार आहे. शनि जयंतीच्या दिवशी जर कोणतीही चूक झाली तर शनिचा कोप होऊ शकतो असं म्हणतात. शनीच्या नाराजीमुळे आर्थिक चणचण, शारीरिक-मानसिक कष्ट, प्रगतीच्या मार्गात अनेक अडथळे यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. शनिची नाराजी टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात. 

शनि जयंतीच्या दिवशी 'या' चुका करू नका 

  • शनिदेवाच्या पूजेमध्ये तांब्याचे भांडे कधीही वापरू नका. तांब्याचा संबंध सूर्याशी असून सूर्य आणि शनीचे वैर आहे. शनिदेवाचे वडील सूर्यदेव आहेत पण ते त्यांचे परम शत्रू आहेत. त्यामुळे शनिदेवाच्या पूजेत तांब्याचे भांडे वापरू नका. 
  • शनीची दृष्टी नेहमी टाळावी. त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना कधीही मूर्तीसमोर उभे राहू नका आणि मूर्तीच्या डोळ्यांत पाहू नका. 
  • शनिदेवाची पूजा करताना आपले तोंड पश्चिमेकडे ठेवावे. 
  • शनि जयंतीच्या दिवशी मीठ, लोखंड, तेल खरेदी करू नका. तुम्हाला दान द्यायचं असेल तर एक दिवस आधी खरेदी करा. शनि जयंतीच्या दिवशी शनिशी संबंधित वस्तू घरी आणण्याची चूक करू नका. 
  • शनि जयंतीच्या दिवशी कोणत्याही पशूला त्रास देऊ नका. ही चूक तुमच्या आयुष्यात संकट आणू शकते. तसेच, सजीवाला त्रास देऊ नका.
  • शनि जयंतीच्या दिवशी मांसाहार आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या जीवनात संकटं येऊ शकतात. त्यामुळे ही चूक करू नका.  
  • शनि हा गरीबांचा रक्षक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी असहाय्य लोक आणि मजुरांना त्रास देऊ नका. तसेच, कोणाची फसवणूक करू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Jayanti 2024 Date : यंदा शनि जयंती नेमकी कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व आणि उपाय

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 November 2026 : शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य
शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य
Rahu Ketu Gochar 2026 : डिसेंबर महिन्यात राहू-केतूचं महासंक्रमण! एका झटक्यात नशीब पालटणार, कोणकोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? वाचा लकी राशी
डिसेंबर महिन्यात राहू-केतूचं महासंक्रमण! एका झटक्यात नशीब पालटणार, कोणकोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? वाचा लकी राशी
Mangal Gochar 2026 : मंगळ-केतूची युती ठरणार धोक्याची? आज रात्रीपासून 3 राशींच्या अडचणी वाढण्याचे संकेत!
मंगळ-केतूची युती ठरणार धोक्याची? आज रात्रीपासून 3 राशींच्या अडचणी वाढण्याचे संकेत!
Vastu Tips : घरात औषधं ठेवण्यासाठी 'ही' दिशा टाळा! आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकतं धोक्याचं; वास्तुशास्त्र काय सांगतं?
घरात औषधं ठेवण्यासाठी 'ही' दिशा टाळा! आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकतं धोक्याचं; वास्तुशास्त्र काय सांगतं?

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Embed widget