Shani Dev : तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य आणि शनी आमने-सामने; 'या' राशी ठरतील भाग्यशाली, कमावतील चिक्कार पैसा
Shani Dev : ऑगस्ट महिन्यात सूर्य राशी परिवर्तन करणार आहे. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश होणार आहे. तर, शनी आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे.
Shani Dev : कर्मफळदाता शनी (Shani Dev) प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देतात. शनीला (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो. त्याचबरोबर सूर्यसुद्धा पुढच्या महिन्यात राशी परिवर्तन करणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य आणि शनी पिता-पुत्र आहेत. पण या दोघांमध्ये शत्रुत्व दिसून येते असं ज्योतिष शास्त्रात म्हटलंय. ऑगस्ट महिन्यात सूर्य राशी परिवर्तन करणार आहे. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश होणार आहे. तर, शनी आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहांच्या राशी स्वराशीत असल्यामुळे एकमेकांच्या समोर आहेत. या दोन्ही ग्रहांच्या राशी एकमेकांच्या समोर असल्यामुळे अनेक राशींच्या (Zodiac Signs) अडचणीत वाढ होणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. या राशीत गुरु आणि मंगळ भ्रमण करणार आहेत. त्यामुळे या राशींच्या जीवनात आनंद असेल. या राशीच्या चौथ्या चरणात सूर्य ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचं करिअर चांगलं असणार आहे. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांकडून तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. जर तुम्हाला प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीत सूर्य विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या दरम्यान तुमच्या अनेक काळापासून सुरु असलेल्या समस्या संपुष्टात येतील. त्याचबरोबर तरुणांना स्पर्धा परीक्षेत चांगलं यश मिळेल. तुम्हाला अचानक धनलाभही होऊ शकतो. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनातही गोडवा असेल. जोडीदाराची साथ तुम्हाला मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
या राशीच्या वृश्चिक राशीत सूर्य विराजमान आहे. त्यामुळे याचा परिणाम तुमच्या करिअरवर होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, जर तुम्हाला नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. आर्थिक बाबतीत तुम्ही खूप सुखी असाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :