Shani Dev : दिवाळीनंतर शनी होणार मार्गी, 'या' 3 राशींसाठी शनी ठरणार लकी; प्रगतीसह पदोपदी मिळेल यश
Shani Dev : शनी हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. तो प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी हा सर्वात महत्त्वाच्या ग्रहांपैकी एक मानला जातो. शनी हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनी (Shani Dev) एका राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत राहतो. त्यामुळे एक राशी संक्रमण पूर्ण करण्यासाठी शनीला (Lord Shani) तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शनी हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. तो प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. शनी सध्या आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. शनीच्या राशी संक्रमणाचा कोणत्या राशींवर (Zodiac Signs) परिणाम होणार आहे ते आपण जाणून घेऊयात.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल फार लाभदायक ठरू शकते. या राशीच्या दुसऱ्या तरणात शनी विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तुमच्या कामाने उच्च अधिकारी खुश होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. या व्यतिरिक्त नवीन नोकरीच्या तुम्हाला अनेक संधी मिळतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीचं मार्गी होणं कर्क राशीच्या लोकांना फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला चांगला नफा मिळेल. या राशीच्या आठव्या चरणात शनी विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला नशीबाची चांगली साथ मिळेल. तसेच, जर तुम्ही नवीन नोकरी शोधण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम लवकरच पूर्ण होईल. त्याचबरोबर, आई- वडिलांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामाला तुम्हाला चांगलं यश मिळेल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आणि मोलाचा ठरणार आहे. त्याच्यामुळे ते दुखावतील असे काही करु नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :