Sankasht Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 'या' गोष्टींचं करा दान; आयुष्यातील सर्व दु:ख होतील दूर, गणरायाचा मिळेल शुभार्शिवाद
Sankasht Chaturthi 2024 : हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 20 सप्टेंबर रोजी रात्री 09 वाजून 15 मिनिटांनी सुरु झाली आहे.
Sankasht Chaturthi 2024 : हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी (Sankasht Chaturthi) साजरी केली जाते. या दिवशी लाडक्या गणरायाची (Lord Ganesh) पूजा केली जाते. तसेच, या दिवशी दान-पुण्याचंही फार महत्त्व आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही वस्तूंचं दान करणं विशेष महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त 2024
हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 20 सप्टेंबर रोजी रात्री 09 वाजून 15 मिनिटांनी सुरु झाली आहे. तर, 21 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 06 वाजून 13 मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्ताचं समापन होणार आहे. उदय तिथीनुसार, अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत शनिवारी 21 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज असणार आहे.
सुख-समृद्धीसाठी करा 'हे' उपाय
- ज्योतिष शास्त्रानुसार, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या भमतेनुसार काही गोष्टींचे दान करणं गरजेचं आहे. जसे की, गरजूंना अन्नदान करणे, फळ, कपडे यांसारख्या गोष्टी दान करणे यामुळे भगवान गणेश प्रसन्न होतात. आणि तुमच्या जीवनात सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद देतात.
- तसेच, आजच्या दिवशी तुम्ही पितळ्याची किंवा स्टीलची भांडीदेखील दान करु शकता. यामुळे देखील बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात.
बाप्पाची सदैव कृपा राहण्यासाठी करा 'हे' उपाय
- संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गाईला चारा चारणे फार पुण्याचं काम मानलं जातं. हा उपाय तुम्ही केल्याने गणरायाबरोबरच गाईची देखील तुमच्यावर सदैव कृपा राहते. त्याचबरोबर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतात.
- तसेच, जर तुम्हाला शक्य असल्यास या दिवशी तुम्ही हत्तीला देखील चारा चारु शकता. यामुळे तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतील.
जर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हे काही खास उपाय केले तर नक्कीच भगवान गणेश तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology : आज मालव्य योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार लाभच लाभ, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ