Shani Dev : शनीची वक्री चाल कधी? 'या' राशींनी राहावं सावध, ढैय्या आणि साडेसातीचाही होणार परिणाम
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी ज्या राशीत वक्री होतो त्या राशीसाठी तो काळ कठीण असतो. शनीच्या वक्री होण्याने कोणत्या राशींवर याचा परिणाम होतो ते जाणून घेऊयात.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही राशीत अडीच वर्ष स्थित राहतात. त्यानंतर ते एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. यासाठीच शनीला सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह म्हटलं जातं. सध्या शनी कुंभ राशीत स्थित आहे.
29 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री चाल करणार आहेत. शनीचं वक्री होणं म्हणजे उलटी चाल चालणं. शनी 29 जून रोजी रात्री 11.40 वाजता वक्री अवस्थेत जाणार आहेत आणि जवळपास 5 महिन्यापर्यंत उलटी चाल चालणार आहेत. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी ते मार्गी होणार आहेत. असं म्हणतात की शनीचं वक्री होणं शुभ नसतं.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी ज्या राशीत वक्री होतो त्या राशीसाठी तो काळ कठीण असतो. त्याचबरोबर ज्या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती आणि ढैय्या असते त्या राशीच्या लोकांना शनीच्या वक्री दरम्यान सावधानतेचा इशारा देण्यात येतो. शनीच्या वक्री होण्याने कोणत्या राशींवर याचा परिणाम होतो ते जाणून घेऊयात.
शनीच्या उलट्या चालीचा 'या' 5 राशींवर होणार अशुभ परिणाम
शनी सध्या आपली मूळ राशी म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. तर, 29 जून रोजी तो याच राशीत वक्री होणार आहे. तर, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसाती सुरु आहे. तसेच, साडेसातीचा प्रतिकूल परिणामसुद्धा या राशींवर होतो. यामधले पहिले चरण फार त्रास देणारे असते, तर, दुसरे चरण फार कष्टकारी असते. आणि तिसरे चरण सावधानतेचे असते. शनीच्या साडेसातीचा कालावधी हा तीन चरणांचा असतो.
या राशींवर सुरु आहे शनीची साडेसातीचा पहिला चरण सुरु आहे. तर, कुंभ राशीचा दुसरा चरण सुरु आहे. आणि मकर राशीच्या लोकांवर साडेसातीचा तिसरा चरण सुरु आहे.अशातच शनीच्या वक्री होण्याचा या तीन राशींवर जास्त परिणाम होतो. या दरम्यान तुम्हाला आर्थिक, मानसिकसह अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
'या' राशींवर सुरु आहे ढैय्या
या व्यतिरिक्त शनीची ढैय्या ज्या राशीच्या लोकांवर सुरु आहे त्यांच्यावर सुद्धा शनीच्या वक्रीचा परिणाम होणार आहे. ढैय्याचा कालावधी हा अडीच वर्षांचा असतो. सध्या कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची ढैय्या सुरु आहे. त्यामुळे शनीच्या वक्रीचा प्रतिकूल परिणाम या राशीच्या लोकांवर देखील पडण्याची शक्यता आहे. शनीच्या वक्री दरम्यान कुंभ, मकर, मीन, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: