Shani Dev : अवघ्या 6 दिवसांनंतर बदलणार शनीची चाल, 'या' राशींना नशीब बदलण्याची संधी; नोकरीत प्रगतीसह होणार आर्थिक भरभराट
Shani Dev : 18 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या ठीक एक दिवसाआधी शनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. याचा परिणाम सर्वच राशींवर होणार आहे.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचाली वेळोवेळी राशींबरोबरच नक्षत्र परिवर्तन देखील करतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर होतो. 18 ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या ठीक एक दिवसाआधी शनी (Shani Dev) पूर्व भाद्रपद नक्षत्रात परिवर्तन करणार आहे. याचा परिणाम सर्वच राशींवर होणार आहे. पण, यामध्ये 3 राशींच्या लोकांचं भाग्य उजळू शकतं. त्याचबरोबर धन-संपत्तीतही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तर, या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार फलदायी असणार आहे. कारण शनीच्या कृपेने तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे. तसेच, अचानक धन-लाभ होण्याचेही चांगले संकेत आहेत. तसेच, या काळात तुमचा व्यापार अधिक वेगाने चालेल. कामानिमित्त तुम्हाला परदेशी जाण्याची देखील शक्यता आहे. जर तुम्हाला नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आजचा काळ चांगला आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने वृषभ राशीच्या लोकांना चांगलाच फायदा मिळणार आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला मान मिळेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर काही कामाच्या जबाबदाऱ्या सोपवू शकतात. त्या तुम्ही नीट जबाबदारीने पाळणं गरजेचं आहे. व्यापारी वर्गातील लोकांना व्यवसायातून चांगला लाभ मिळेल. तसेच तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत असेल. मित्रांच्या साहाय्याने नोकरीत चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aqurius Horoscope)
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा कुंभ राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडणार आहे. तसेच, शनी तुमच्या लग्न भावात असल्या कारणाने याचे शुभ परिणाम मिळतील. जे तरुण लग्नाच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं असणार आहे.
तुमच्या कुंडलीत शश राजयोग असल्या कारणाने तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही जे काही काम कराल त्यात तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 12 August 2024 : आजचा सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य