![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shani Dev : शनि आणि बुध ग्रहाने नक्षत्र बदललं; ‘या’ 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, बक्कळ धनलाभासह येणार श्रीमंती
Shani Budh Nakshatra Parivartan : बुध ग्रह आणि शनि यांच्यात मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे बुध आणि शनीचं एकाच वेळी होत असलेलं नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी शुभ सिद्ध होऊ शकतं. या दोन ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनामुळे 3 राशींना चांगले दिवस येतील, त्यांच्या हातात पैसा टिकेल.
![Shani Dev : शनि आणि बुध ग्रहाने नक्षत्र बदललं; ‘या’ 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, बक्कळ धनलाभासह येणार श्रीमंती shani budh nakshatra parivartan 2024 these zodiac signs will get benefit and financial success shani will bless these zodiacs with lot of money Shani Dev : शनि आणि बुध ग्रहाने नक्षत्र बदललं; ‘या’ 3 राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ, बक्कळ धनलाभासह येणार श्रीमंती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/09/7343808a900c797adc747c97541777d01709954528543713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Budh Transit : आज शनिवारचा दिवस शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे आणि आजच्याच दिवशी शनि आणि बुध ग्रहाने आपलं नक्षत्र बदललं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह जेव्हा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात किंवा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. काही मंडळींसाठी हे नक्षत्र परिवर्तन शुभ ठरू शकतं, तर काहींना मात्र या काळात अपार कष्ट सहन करावे लागू शकतात.
शनिदेव हे कलियुगातील न्यायदेव म्हणून ओळखले जातात. शनिदेवाने आज, म्हणजेच 9 मार्च 2024 रोजी मध्यरात्री 1 वाजून 26 मिनिटांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. शतभिषा हे राहूचं नक्षत्र आहे, त्यात शनि आणि राहूची चांगली मैत्री आहे, त्यामुळे हा काळ अनेक राशींसाठी शुभ सिद्ध होणार आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे, बुध ग्रहाचं देखील आज नक्षत्र परिवर्तन झालं आहे. बुध ग्रहाने उतरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे, ज्याचा शुभ परिणाम अनेक राशींवर पडणार आहे. या काळात 3 राशीचं भाग्य उजळणार आहे, प्रचंड धनलाभ आणि प्रगतीचे योग आहेत. या नशीबवान राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया...
मिथुन रास (Gemini)
बुध आणि शनिदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना अतिशय शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरीच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा मिळण्यासोबतच धनलाभही होण्याची शक्यता आहे, शनीच्या कृपेने लवकरच तुमची पगारवाढ होऊ शकते. या काळात तुम्हाला खूप फायदा मिळेल, तुमचा बँक बँलन्स वाढेल. वैवाहिक आणि प्रेम जीवन चांगलं राहील.
कर्क रास (Cancer)
ज्योतिष शास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन शुभ वार्ता घेऊन येणार आहे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला सिद्ध होणार आहे. महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल, या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. प्रत्येक कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
तूळ रास (Libra)
या राशीच्या लोकांना बुध आणि शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही चांगली बातमी मिळू शकते. जे लोक राजकारणात करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. नोकरीत नवीन संधी मिळतील. तुम्ही एखाद्या मोठ्या नेत्याच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)