(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज सिद्ध योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींना मिळणार धनलाभाच्या अनेक संधी, राशीनुसार करा 'हे' अचूक उपाय
Panchang 9 March 2024 : आज, म्हणजेच 9 मार्च रोजी सिद्ध योग, षष्ठ योगासह अनेक प्रभावी योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस सिंह, तूळ, मीन राशीसह इतर 5 राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याच बरोबर,आज शनिवार हा शनिदेवाला समर्पित असल्यामुळे या 5 राशींवर शनिदेवाची देखील शुभ दृष्टी राहील.
Astrology Today 9 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज शनिवार, 9 मार्चला चंद्र शनिदेवाच्या कुंभ राशीत असणार आहे, जिथे शनि, सूर्य आणि शुक्र आधीच उपस्थित आहेत. तसेच आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असून या दिवशी सिद्ध योग, षष्ठ योग, साध्ययोग आणि धनिष्ठा नक्षत्र यांचा शुभ संयोग देखील होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे.वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल. या 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील, त्यामुळे तुमच्या उत्पन्नातही वाढ होईल. आज तुम्ही वायफळ खर्च टाळला पाहिजे, पैशांची बचत केली पाहिजे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळेल. घरात तुम्ही तुमच्या जोडीदाराला महत्त्वाच्या कामांमध्ये मदत कराल, ज्यामुळे तुमचे संबंध सुधारतील. आज वीकेंड असल्याने तुम्ही मुलांसोबत खेळण्यातस मज्जा करण्यात दिवस घालवाल, यामुळे तुमचा दिवसभराचा कामाचा क्षीण निघून जाईल. आज तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं राहील. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात, त्यांना चांगल्या संधी मिळतील.
उपाय - शनिवारी काळे वस्त्र दान करावे.
सिंह रास (Leo)
आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी चांगलाअसणार आहे. आज नफा मिळवण्यासाठी तुम्ही केलेल्या सर्व प्रयत्नांत तुम्हाला यश मिळेल, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. जर तुम्हाला करिअरची चिंता सतावत असेल, तर आज शनिदेवाच्या कृपेने तुमचे सर्व काम मार्गी लागेल, प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. ऑफिसमध्ये बॉस तुमच्या कामावर खुश राहील, तुम्हाला लवकरच बढती मिळू शकेल. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात तुम्ही चांगला नफा कमवाल. वैवाहिक जीवनात सुरू असलेला वाद आज संपुष्टात येईल आणि तुम्ही गुण्यागोविंदानं एकत्र वेळ घालवाल.
उपाय - शनिवारी गरीब आणि गरजूंना मदत करा.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. शनिदेवाच्या कृपेने आज तूळ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमचे अडकलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही आज तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवाल, ज्यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकाल आणि तुम्हाला एखादी चांगली डील देखील मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
उपाय - शनिवारी काळ्या मुंग्यांना काळे तीळ आणि पीठ घाला.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. मकर राशीच्या लोकांनी भविष्यासाठी काही योजना आखल्या असतील तर त्या आज यशस्वी होतील. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. सरकारी योजनांशी संबंधित रखडलेली कामं पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या भावाबहिणींकडून काही मदत मागितली तर ते आज तुम्हाला सहज मदत करतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या रोमँटिक ठिकाणी जाण्याचा विचार कराल. आज तुमची कौटुंबिक स्थिती चांगली राहील.
उपाय - शनिवारी काळे फुटाणे खा.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. मीन राशीच्या लोकांच्या मनातील संभ्रम आज शनिदेवाच्या कृपेने दूर होतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमचे तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळेल, आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्हाला तुमचे कुणी नातेवाईक भेटायला येऊ शकतात. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा विचार कराल.
उपाय - शनिवारी काळे तीळ वाहत्या पाण्यात अर्पण करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani 2024 : ऐन होळीच्या काळात होणार शनीचा उदय; लागणार चंद्रग्रहण, 'या' 3 राशी कमावणार बक्कळ पैसा