Sankashti Chaturthi 2024 : जुलै महिन्यात कधी आहे संकष्ट चतुर्थी? नोट करा पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त
Sankashti Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं.
Sankashti Chaturthi 2024 : हिंदूधर्मग्रंथानुसार, प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2024) असते. ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला (Lord Ganesha) समर्पित आहे. कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं.
प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते. तसेच, बुद्धी प्राप्त होते. यावेळेच जुलै महिन्यातील संकष्ट चतुर्थी कधी आहे ते जाणून घेऊयात.
कधी आहे संकष्ट चतुर्थी?
हिंदू पंचांगानुसार, चतुर्थी तिथीचं व्रत 24 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. तसेच, ही तिथी दुसऱ्या दिवशी 25 जुलै रोजी सकाळी 04 वाजून 19 मिनिटांनी समाप्त होणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीला फार महत्त्व आहे. अशातच उदयतिथीनुसार, 24 जुलै रोजी संकष्ट चतुर्थीचं व्रत असणार आहे.
संकष्ट चतुर्थी पूजा विधी (Sankashti Chaturthi Puja Vidhi 2024)
- संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा.
- त्यानंतर, घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावा.
- विधीनुसार, गणेशाला जल अर्पण करा.
- त्यानंतर, गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला. आणि कुंकू लावा.
- तसेच, या दिवशी घरात घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की, मिठाई, मोदक असा प्रसाद चढवा.
- देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा.
- देवाची मनोभावे आरती करा.
- पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :