Numerology : फार मेहनत करूनही 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे टिकत नाही पैसा; नेहमीच जाणवते पैशांची कडकी
Numerology : मूलांक आणि ग्रहांच्या संयोगाने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्याच्या स्वभावाबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकते.
Numerology Of Moolank 3 : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रालाही (Ank Shastra) महत्त्व आहे. यामध्ये व्यक्तीचा त्याच्या जन्मतारखेनुसार मूलांक (Moolank) ठरवला जातो. याच मूलांकाच्या आधारे व्यक्तीचं भविष्य, त्याचा स्वभाव ठरवला जातो. जन्मतिथीनुसार (Birth Date) निघणाऱ्या या मूलांकांचा संबंध थेट ग्रहांशी आहे.
मूलांक आणि ग्रहांच्या संयोगाने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्याच्या स्वभावाबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे मूलांक 3 च्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो तसेच त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं असते त्याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहा. अशा लोकांचा मूलांक 3 असतो. या ठिकाणी वाढदिवसाच्या अंकांची बेरीज करायची असते. त्यानंतर त्यातून जो नंबर येतो ती संख्या तुमची मूलांक संख्या असते. अशा प्रकारे प्रत्येक जन्मतारखेच्या लोकांचा मूलांक काढता येतो.
मूलांक 3 ची आर्थिक स्थिती कशी असते?
अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 च्या लोकांना आयुष्यात फार मेहनत घ्यावी लागते. फार मेहनत घेऊनही यांची आर्थिक परिस्थिती फारशी बदलत नाही. या लोकांना अनेकदा आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. या जन्मतारखेचे लोक इतरांप्रमाणेच आपल्या कामाशी प्रामाणिक असतात. प्रचंड मेहनत घेतात पण तरीही या जन्मतारखेच्या लोकांना सतत पैशांची कडकी जाणवत असते.
कोणासमोरही पैसे मागायला आवडत नाही
अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 च्या लोकांना जरी पैशांची चणचण जाणवत असली तरी त्यांना त्यांच्या आत्मसन्मानाबद्दल प्रचंड आदर असतो. त्यासाठी ते कोणापुढेही फार पटकन झुकत नाहीत. तसेच, इतरांसमोर या लोकांना लगेच हात पसरवायला आवडत नाही. यामुळेच या जन्मतारखेचे लोक इतरांच्या फार पसंतीस येतात. त्यांच्या मनात या जन्मतारखेच्या लोकांबद्दल वेगळी ओळख निर्माण होते.
ध्येयाला गाठण्यासाठी नेहमी असतात प्रयत्नशील
अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 च्या लोकांचं एक वैशिष्ट्य सर्वांना आवडतं ते म्हणजे जरी यांच्यावर कितीही कठीण परिस्थिती आली तरी यांना हार मानायला आवडत नाही. समोर आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी हे लोक नेहमी तत्पर असतात. थोडक्यात हार न मानणं आणि सतत प्रयत्नशील असणं हा या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव असतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: