Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्याचं होणार संक्रमण; रातोरात बदलेल 'या' 6 राशींचं भाग्य, शुभ योगासह मिळतील 'हे' संकेत
Surya Gochar 2024 : सूर्य प्रत्येक महिन्याला आपल्या राशीत परिवर्तन करतो. जून महिन्यात देखील सूर्याचं संक्रमण होणार आहे.
Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालानंतर संक्रमण करतात. ग्रहांच्या या संक्रमणाचा सर्व राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतो. ग्रहांचा राजा हा सूर्य (Sun) आहे. सूर्य प्रत्येक महिन्याला आपल्या राशीत परिवर्तन करतो. जून (June) महिन्यात देखील सूर्याचं संक्रमण होणार आहे. त्यानुसार, पुढच्या महिन्यात सूर्य बुध राशीत (Zodiac Sign) प्रवेश करणार आहे.
हिंदू पंचांगानुसार, सूर्य 15 जून रोजी रात्री 12 वाजून 16 मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या मिथुन राशीत संक्रमण केल्याने काही राशींवर फार चांगला परिणाम होणार आहे. तर, काही राशींना या काळात सावध राहण्याची गरज आहे. सूर्याच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींना बंपर लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा मेष राशीच्या पंचम चरणाचा स्वामी आहे. सूर्याचा तिसऱ्या चरणात प्रवेश होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून लाभ मिळेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. इतकंच नाही तर, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
सूर्य मिथुन राशीच्या तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणाचा मिथुन राशीच्या लोकांवर चांगला परिणाम दिसून येणार आहे. या दरम्यान तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांनाही याचा चांगलाच लाभ होणार आहे. तुमच्या पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्याचा अंदाज आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
सूर्याच्या संक्रमणाचा कन्या राशीवर देखील परिणाम दिसून येणार आहे. या राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, करिअरमध्ये देखील चांगले सकारात्मक परिणाम दिसून येतील. या कालावधीत तुम्ही परदेशी जाण्याचा विचार देखील करू शकता. तुमच्या व्यवहारात चांगला नफा होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: