Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या जोडप्यांना अनेक समस्यांचा करावा लागतो सामना
Numerology: ज्योतिष शास्त्राप्रमाणे अंकशास्त्राच्या आधारावर एखाद्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व सांगितलं जाऊ शकतं.
Numerology: ज्योतिष शास्त्राप्रमाणे अंकशास्त्राच्या आधारावर एखाद्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व सांगितलं जाऊ शकतं. हे ज्योतिष शास्त्र राशी आणि कुंडलीच्या आधारे कार्य करते, असंही म्हटलं जातं. जन्मतारखेच्या आधारावर सबंधित व्यक्तीचा स्वभाव, व्यवहार आणि इतर गोष्टी कळतात. याशिवाय, अंकशास्त्रानेही माणसाचं भविष्य चांगलं ओळखता येतं. यासाठी फक्त जन्मतारीख आवश्यक आहे. अंकशास्त्राच्या आधारावर ही भविष्यवाणी केली जाते.
जन्मतारिखेच्या आधारावर अनेकांचे दोष आणि गुणधर्म सांगितलं जाऊ शकतं. त्यासाठी एक विशेष क्रमांक असतो. कोणत्याही महिन्याच्या 7, 16 (1+6=7) आणि 25 (2+5=7) तारखेला जन्मलेल्या लोकांचा क्रमांक 7 असतो. अंकशास्त्रानुसार, या तारखेला जन्मलेले लोक मनाने खूप चांगली असतात. हे लोक स्वत: सह इतरांचीही काळजी घेतात.
विवाहित जीवनात येतात अनेक अडचणी
7, 16 आणि 25 या तारिखेला जन्मलेले लोक जोडीदारांची खूप काळजी करतात. मात्र, विवाहिक जीवनात त्यांना अनेक अडचणींच्या सामोरे जावा लागतं. तसेच या लोकांचं आपल्या जोडीदारासह जास्त पटत नाही किंवा प्रेमात त्यांची फसवणूक होते. त्यांना आपल्या भावना चांगल्या पद्धतीनं व्यक्त करता येत नाहीत. यामुळं त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावा लागतं. हे लोक लेखक, ज्योतिषी, न्यायाधीश किंवा वैद्यकीय व्यवसायात आपलं करिअर करतात.
मनात अनेक गोष्टी साठवतात
या तारिखेला जन्मलेली लोक मनात गोष्टी साठवतात. लवकर कोणाशी काही शेअर करीत नाहीत. इतरांच्या मनातलं त्यांना लगेच कळतं. परंतु, आपल्या मनातील गोष्टी कोणालाही कळू देत नाहीत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-