एक्स्प्लोर

Angarki Sankashti Chaturthi 2021 : आज अंगारकी चतुर्थी, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी

Angarki Sankashti Chaturthi 2021 : संकष्टीचा अर्थ दुःखाचा पराभव करणारा असा होतो. भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात.

Angarki Sankashti 2021: गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थी आज मंगळवारी आहे. अंगारकी चतुर्थी म्हटलं की गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसतो. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे. त्यामुळे भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. आज 23 नोव्हेंबर रोजी रात्री 08:27 वाजता चंद्रोदय होईल.          

गेले दोन वर्ष कोरोनामुळे लोकांना अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेता आलेलं नाही. पण यंदा कोरोना ओसरु लागला आहे. महाराष्ट्र सरकारने मंदिरं सुरु केली आहे. त्यामुळे शासनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत आपल्याला गणपती मंदिरात जाता येईल. असं असलं तरी देखील यंदा मंदिरांमध्ये तुलनेनं कमी गर्दी पाहायला मिळू शकते. 

संकष्टीचा अर्थ दुःखाचा पराभव करणारा असा होतो. भाविकही अगदी भक्तीभावाने गणेशाची पूजा करून, त्याच्यासाठी उपवास धरून हे व्रत करतात. संकष्टी चतुर्थी हा दिवस सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला समर्पित करण्यात येतो. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते, यामुळे घरात प्रसन्न वातावरण बनतं.

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पूजेचा विधी

 या दिवशी पहाटे उठून स्नान करा. यानंतर गणपतीची प्रार्थना करा. चौरंगावर स्वच्छ पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरुन त्यावर गणपतीची मूर्ती ठेवा. आता गंगा जल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा. यानंतर फुलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा. मग लाल रंगांचं फूल, जान्हवं, धूप, पानात सुपारी, लवंग, इलायची आणि एखादी मिठाई ठेवा. यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करुन 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यानंतर धूप, दिवा आणि उदबत्तीने गणपतीची आरती करा.

संकष्टी चतुर्थीची पूजा- विधी
- सकाळी उठल्यानंतर आधी आंघोळ करा आणि स्वच्छ धुतलेले कपडे घाला.
- सकाळी गणपतीची पूजा करा.
- गणपतीला तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन अर्पण करा, वंदन करा.
- संध्याकाळी गणपतीचे पूजन करा.
- व्रत कथा सांगा किंवा ऐका.
- चंद्राला अर्ध्य अर्पण करा.
- या दिवशी गणपतीच्या मंत्रांचा जप करावा.
- पूर्ण दिवसभर उपवास ठेवावा. चंद्रोदयानंतर सोडावा.

संबंधित बातम्या

Angarki Sankashti Chaturthi 2021: अंगारकीनिमित्त सिद्धिवियानक मंदिराची जय्यत तयारी; पूजा, आरती ते प्रसादापर्यंत नियमावली जारी

Angarki Sankashti Chaturthi 2021: अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा द्या, गणपतीला वंदन करा, असं करा व्रत

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Maharashtra Live blog updates: नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मुलाला पुण्यातून घेतलं ताब्यात; 'त्या' ऑडिओ क्लिप प्रकरणाशी संबंध?
Devendra Fadnavis and PM Modi: दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
दिल्लीतील दोन गुजरात्यांना हटवा, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Embed widget