(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manu Bhaker Bhagavad Gita : मनु भाकरच्या ऑलिम्पिक मेडल विजयाचं श्रेय भगवद्गीतेला; श्रीकृष्ण आणि गीतेने कशी मदत केली? मनुने सांगितली Inside स्टोरी
Manu Bhaker Wins Bronze Medal Paris Olympics 2024: भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली. स्पर्धा जिंकण्यात श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेच्या शिकवणीने तिला कशी मदत केली याचा उलगडा मनुने केला आहे.
Manu Bhaker Bhagavad Gita : भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या अंतिम फेरीत भारतासाठी पहिलं कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. नेमबाजीच्या अंतिम फेरीत जिंकण्यासाठी भगवान कृष्ण आणि भगवद्गीतेच्या शिकवणीने कशी मदत केली, हे मनुने उघड केलं.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. मनु भाकरने चॅटॉरॉक्स नेमबाजी केंद्रावर झालेल्या अंतिम फेरीत 221.7 गुणांसह तिसरं स्थान पटकावलं आहे.
भगवद्गीतेने मनुला मदत कशी केली?
पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर बोलताना मनु म्हणाली, श्रीकृष्ण आणि भगवद्गीतेच्या शिकवणीने तिला अंतिम फेरीत तिचं डोकं शांत ठेवण्यात आणि पॅरिस गेम्समध्ये भारत देशासाठी पहिलं पदक जिंकण्यास मदत केली.
मनु गीतापठण खूप करते. तणावपूर्ण फायनल दरम्यान तिच्या मनात काय चाललं होतं याबद्दल बोलताना मनु म्हणाली, तिला महाभारताच्या वेळी भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलेले शब्द आठवले आणि तिचं लक्ष फक्त त्या मार्गावर होतं.
'कर्म पे ध्यान दो, फल की चिंता मत करो'
तुम्ही तुमचं काम करत राहा, फळाची चिंता करू नका, असं महाभारताच्या काळात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं. मनुने याच शिकवणीचं अनुसरण केलं. मनु भाकरने स्पष्ट केलं की, तिला निकालाची चिंता नव्हती आणि तिला अंतिम फेरीदरम्यान फक्त तिच्या कर्मावर लक्ष केंद्रित करायचं होतं.
पुढे मनु म्हणाली, "स्पर्धेच्या रात्री मला शांत झोप लागली. कारण पदक मिळेल की नाही, याचा मी विचार करत नव्हते. आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. हिंमत सोडायची नाही, एवढाच मी मनाशी निश्चय केला होता."
धार्मिक शक्तीची ताकद
तिचा अनुभव शेअर करताना मनु म्हणाली, "टोकियो ऑलिम्पिकनंतर मी खूप धार्मिक झाली आहे. पण अजिबात कट्टर नाही. मी देवाला मानते. आपल्यासभोवती असलेली उर्जा आपल्याला मार्ग दाखवत असते. देवानं ही सृष्टी घडवली. तुम्हा आम्हाला घडवलं. त्याच्यावर आपल्याला विश्वास असायला हवा."
श्रीकृष्णाने भगवद्गीतेत काय म्हटलं आहे?
महाभारत युद्ध सुरू होण्याच्या अगदी आधी, कुरुक्षेत्र रणांगणाच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्णाने पांडवपुत्र अर्जुनला उपदेश केला. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश श्रीमद भागवत गीता या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीमद भागवत गीता हा महाभारतातील भीष्मपर्वाचा एक भाग आहे. या पुस्तकात 18 प्रकरणं आणि 700 श्लोक आहेत.
श्रीमद भागवत गीतेत श्रीकृष्ण कर्म करण्याची प्रेरणा देतात. गीतेतील अनेक श्लोक जीवनाचे तत्वज्ञान आणि जगण्याची कला शिकवतात. ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने गीतेचं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. कर्म आणि कर्माचं फळ यावर श्रीमद भागवत गीतेमध्ये हे श्लोक आहेत.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मां कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोस्तवकर्मणि ॥ (दुसरा अध्याय, श्लोक 47)
म्हणजे फक्त तुमच्या कृतींवर तुमचा अधिकार आहे, तुमच्या कृतीच्या फळावर तुमचा अधिकार नाही. म्हणून, आपले कार्य करा, परंतु परिणामांची चिंता करू नका. तुम्हाला फक्त तुमची कर्तव्यं पार पाडण्याचा अधिकार आहे. म्हणून, आपण आपल्या कृतींच्या परिणामांची काळजी करू नये.
हेही वाचा:
Vastu Tips : जेवल्यानंतर ताटात हात धुणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...