(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : जेवल्यानंतर ताटात हात धुणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : अनेक जणांना जेवल्यानंतर ताटातच हात धुण्याची सवय असते. परंतु वास्तूशास्त्रानुसार, ताटात खरकटा हात धुतल्याने देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा नाराज होते, या गोष्टीचे वाईट परिणाम व्यक्तीला पुढे भोगावे लागतात.
Vastu Tips : अनेकांना आपण ज्या ताटात जेवतो, त्याच ताटात हात धुण्याची सवय असते. हिंदू धर्मात अन्नाला देवाचा दर्जा आहे. जेवलेल्या ताटात हात धुणं हे शास्त्रात अशुभ मानलं जातं, यामुळे देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी नाराज होते. शास्त्रात असं म्हटलं आहे की, अन्नपूर्णा देवी कोपली तर तिथूनच तुमच्या गरिबीची सुरुवात होते आणि तुमचे वाईट दिवस सुरू होतात. घरातील संपत्ती संपुष्टात येऊ लागते आणि काही वेळातच तुम्ही रस्त्यावर उतरता. जेवणाशी संबंधित काही वास्तुशास्त्राचे (Vastu Tips) नियम तुम्हाला माहित असले पाहिजे. या नियमांबद्दल जाणून घेऊया.
जेवणानंतर ताटातच हात धुवू नका
ज्या ताटात आपण जेवतो, त्याच ताटात हात कधीच धुवू नये. वास्तुशास्त्रानुसार, असं केल्याने देवी अन्नपूर्णा कोपतात. तसेच असं केल्याने देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात वास करत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जेवल्यानंतर ताटातच हात धुतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते. तुमचा पैसा अनावश्यक गोष्टींवर खर्च होतो आणि पैशांची तंगी जाणवते. घरात हळूहळू पैशांची कमतरता भासू लागते.
पलंगावर बसून जेवू नका
तुम्ही कुठे बसून जेवता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कधीही पलंगावर बसून जेवू नये. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.
ताटात अन्न टाकू नका
तुम्हाला जितकं गरजेचं आहे, तितकंच अन्न ताटात घ्या. ताटात घेतलेलं अन्न वाया घालवू नका. कधी चुकून ताटात जेवण उरलं तर ते फेकून देऊ नये, उरलेलं अन्न प्राण्यांना खाऊ घालावं.
जेवताना तीन चपात्या वाढू नका
कधीही जेवण वाढताना दोन किंवा चार चपात्या द्याव्या. ताटात कधीही तीन चपात्या देऊ नका. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं करणं योग्य नाही आणि हे अशुभ मानलं जातं.
जेवण घेण्यापूर्वी ताट व्यवस्थित स्वच्छ करा
अन्न घेण्यापूर्वी नेहमी भांडं किंवा ताट व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे. जर त्यामध्ये पाण्याचे थेंब असतील किंवा डाग असतील तर ते जेवण वाढून घेण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे, नाहीतर जेवणाचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा नाराज होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: