![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाच्या चालीत बदल; 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Mangal Gochar In Cancer : मंगळ ग्रह लवकरच कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि हा काळ काही राशींसाठी फार भाग्याचा ठरणार आहे, या काळात 3 राशींचं नशीब पालटू शकतं.
![Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाच्या चालीत बदल; 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ Mangal Gochar 2024 Positive Impact Mars Transit in Cancer these zodiac signs will get lucky and lot of money before diwali Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाच्या चालीत बदल; 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/29/42f2789c0c4e98e9da069eaa77343d5f1727592023698713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mangal Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला पृथ्वीचा पुत्र मानलं जातं. मंगळ (Mars) हा कडक ग्रह आहे, जो 18 महिन्यांनंतर आपली रास बदलतो. यातच मंगळ आता ऑक्टोबरमध्ये कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या हालचालीतील हा बदल दिवाळीपूर्वी होणार आहे. अशा स्थितीत मंगळाच्या संक्रमणामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मंगळाचा राशी बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या दीड वर्षांच्या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तसेच, या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच या काळात तुमच्या मनात नवीन विचार येतील, नवीन कल्पना येतील, जे तुम्ही सत्यात उतरवून खूप प्रगती कराल. या काळात तुम्हाला व्यवसायात अनेक नवीन डील मिळू शकतात, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. या काळात ज्या लोकांचा व्यवसाय स्थावर मालमत्तेशी संबंधित आहे, त्यांना विशेष लाभ होऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio)
मंगळाचं राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. या काळात तुमचं नशीब उजळू शकतं. तसेच या काळात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. इच्छित नोकरी मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. याशिवाय, तुम्हाला व्यवसायातही अनेक नवीन डील मिळतील. तसेच या काळात तुम्ही विविध धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्हाला व्यवसायात अनेक डील मिळू शकतात, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
मीन रास (Pisces)
मंगळाचं मार्गक्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतं. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच, जर तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. त्याचबरोबर नोकरदार लोकांचीही प्रगती होईल. तुम्हाला नोकरीच्या अनेक ऑफर मिळू शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात. त्याचबरोबर मीन राशीचे लोक ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांना गुंतवलेल्या पैशातून दुप्पट नफा मिळू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)