Makar Sankranti 2023 : यंदाची मकर संक्रांती 14 की 15 जानेवारी? तारखेबाबत संभ्रम, जाणून घ्या काय सांगितलंय शास्त्रात?
Makar Sankranti 2023 : दरवर्षी मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2023) सण 14 जानेवारीला येते. पण यंदा मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Makar Sankranti 2023 : 2023 वर्षी मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काहींच्या मते मकर संक्रांतीची तारीख 14 जानेवारी तर काहींच्या मते 15 जानेवारी अशी सांगण्यात येत आहे. जाणून घ्या नेमकं काय सांगितलंय शास्त्रात?
मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम
या वर्षी 2023 मध्ये देखील मकर संक्रांतीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. कोणी 14 तर कोणी 15 जानेवारी मकर संक्रांतीची तारीख सांगत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये मकर संक्रांतीच्या तिथीचे काय नियम आहेत?
एका राशीतून दुसऱ्या राशीत बदल
याचा अर्थ भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे धनु राशीपासून मकर राशीत होणारे बदल हे अंधारातून प्रकाशात होणारे परिवर्तन मानले जाते. कारण मकर संक्रांतीच्या वेळी सूर्य उगवण्यास सुरुवात होते. त्यामुळे दिवस मोठे आणि रात्र लहान होऊ लागतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि सुर्यदेवाला अर्घ्य देण्याची प्रथा आहे.
अंधारावर प्रकाशाचा विजय!
मकर संक्रांत म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. मानवी जीवन देखील प्रकाश आणि अंधाराने वेढलेले आहे. मानवी जीवनातील अज्ञान, शंका, अंधश्रद्धेला श्रद्धेने, आणि वाईट संस्कारांना चांगल्या संस्काराने दूर करण्यात जो यश मिळवतो. यालाच मानवाच्या आयुष्यातील खरी संक्रांत म्हणतात.
मकर संक्रांती 2023 तारीख आणि शुभ वेळ
हिंदू पंचांगानुसार यावेळी मकर संक्रांती 15 जानेवारी 2022 रोजी येत आहे. कारण सूर्यदेव 14 जानेवारीच्या रात्री 08:43 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करतील, त्यामुळे उदयतिथीनुसार दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांती साजरी केली जाईल.
मकर संक्रांतीला विशेष योगायोग!
15 जानेवारीला मकर संक्रांतीचा पुण्य काळ असेल, ज्यामध्ये सूर्योदयापासून दिवसभर दान आणि पुण्य करता येईल. या दिवशी सूर्य, शनि आणि शुक्र मकर राशीत असल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे.
भाग्याचे बंद दरवाजे उघडतात
यासोबत चित्रा नक्षत्र, षष्ठ योग सुकर्म योग, वाशी योग, सनफा योग आणि बलव करण योग तयार होतील. हा योग अनेक लोकांचे भाग्य उजळवतील. या योगांमध्ये शुभ कार्य, दान, पुण्य, तीर्थयात्रा केल्याने भाग्याचे बंद दरवाजे उघडतात. अशी धार्मिक मान्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Makar Sankranti 2023 : नवीन वर्षातला पहिलाच सण म्हणजे 'मकरसंक्रांत'; वाचा या दिनाचं पारंपरिक महत्त्व