Lucky Zodiac Signs : 18 ऑक्टोबरचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना अचानक होणार धनलाभ, नशिबाचे दार उघडणार
Lucky Zodiac Signs On 18 September 2025 : उद्या शनिवारचा दिवस हा शनि देवाला समर्पित आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.

Lucky Zodiac Signs On 18 September 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या चालीनुसार प्रत्येक राशींचं आकलन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह आहे. त्या ग्रहाचा त्या राशीवर जास्त प्रभाव असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 18 सप्टेंबरचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. कारण उद्या धनत्रयोदशीचा दिवस आहे तसेच, शनीचा देखील दिवस आहे. त्यानुसार, उद्या शनिवारचा दिवस हा शनि देवाला (Shani Dev) समर्पित आहे. अशा वेळी कोणत्या राशींसाठी उद्याचा दिवस लकी असणार आहे ते जाणून घेणार आहोत.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी उद्याचा दिवस प्रगतीचा असणार आहे. या काळात देवी लक्ष्मी आणि कुबेराची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, या काळात धनलाभाचे अनेक संकेत तुम्हाला मिळतील. बिझनेस करणाऱ्या लोकांनाही याचा लाभ मिळेल. धनसंपत्तीत तुमची वाढ दिसून येईल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान कायम राहील. मित्र-परिवाराबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. उद्याच्या दिवसात तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही मनापासून काम कराल. तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक केलं जाईल. तसेच, हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडाल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी उद्याचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमच्या बिझनेसमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या कामातून तुमची प्रगती दिसेल. तसेच, ग्रहांच्या शुभ स्थितीचा परिणाम देखील या राशीवर होताना दिसणार आहे. तुमचा मानसिक तणाव दूर होईल. तसेच, तुम्ही हाती घेतलेलं कार्य पार पडेल. धार्मिक कार्यात रस राहील.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार पूर्वीपेक्षा वाढलेला दिसेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायक असणार आहे. या काळात तुमची समाजातील प्रभावशाली लोकांशी भेटीगाठी होतील. नवीन प्रोजेक्टवर काम करण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीचे अनेक संकेत आहेत.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी उद्याचा दिवस फार अनुकूल असणार आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. तसेच, पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता मिळेल. मित्र मैत्रीणींचा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















