Budh Gochar 2025 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच लागणार जॅकपॉट; बुध ग्रहाच्या संक्रमणाने 'या' 5 राशी जगतील राजासारखं आयुष्य
Budh Gochar 2025 : 24 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. या ठिकाणी बुध ग्रहाच्या आगमनाने अनेक राशींचे चांगले दिवस सुरु होणार आहेत.

Budh Gochar 2025 : हिंदू पंचांगानुसार, दिवाळीनंतर (Diwali 2025) म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुध (Budh Gochar) ग्रह वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. या ठिकाणी बुध ग्रहाच्या आगमनाने अनेक राशींचे चांगले दिवस सुरु होणार आहेत. या काळात स्मार्ट प्लॅनिंग केल्यास तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या दरम्यान बुध ग्रहाच्या संक्रमणाने कोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मंगळ ग्रहाच्या राशीत बुधाची एन्ट्री
24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला बुद्धी, वार्ता, व्यवसाय आणि अध्यायनाचा कारक ग्रह मानतात. तसेच, वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे. म्हणजेच, विचार, रहस्य आणि परिवर्तनाचा प्रतीक आहे. या संक्रमणाने बुध ग्रहाची एनर्जी अधिक गंभीर होईल. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी बुध ग्रहाचं संक्रमण फार प्रभावी ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात अनेक चांगले बदल घडताना दिसतील. तसेच, तुमचं संवादकौशल्य चांगलं राहील. या काळात जर तुम्हाला नवीन प्रोजेक्टची सुरुवात करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी फार शुभकारक असणार आहे. संशोधनाच्या संदर्भातील कामात तुम्हाला आणखी संधी मिळेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या दुसऱ्या चरणात हे संक्रमण होणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. पैसे कमावण्याच्या अनेक संधी तुमच्यासमोर खुल्या होतील. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. व्यवसायात तुम्हाला नवीन डील मिळू शकते.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या तिसऱ्या चरणात बुधाचं संक्रमण होणार आहे. या राशीच्या संवादकौशल्य आणि भावा-बहिणींच्या नातेसंबंधांवर आधारित हा ग्रह आहे. या काळात तुमचं संवादकौशल्य उत्तम असणार आहे. तसेच, तुम्ही मेहनतीने केलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच, तुमच्या कल्पनांना चांगला वाव मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी बुध ग्रहाच्या संक्रमणाचा काळ शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुख-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला मानसिक सुख-शांती मिळेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. नवीन वस्तूंची करेदी तुम्ही करु शकता.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी बुध ग्रहाचं संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक चांगले बदल घडून येतील. पार्टनरबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















