Leo Weekly Horoscope 29 April to 5 May : सिंह राशीचा नवीन आठवडा सुखाचा; 4 मेपर्यंत मिळणार गोड बातमी, धन-संपत्ती होणार वाढ, वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Leo Weekly Horoscope 29 April to 5 May : नवीन आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. नोकरी-व्यवसायात तुम्ही चांगली प्रगती कराल. तसेच तुमच्या हातात पैसा खेळता राहील.
Leo Weekly Horoscope 29 April to 5 May : एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा संपून आता मे महिना सुरू होईल. हा आठवडा नेमका कसा असणार आहे याची प्रत्येकाला उत्सुकता आहे. या काळात नोकरी-व्यवसायातून तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधांसाठीही हा आठवडा उत्तम राहील, तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीत तुमचं काम चांगलं राहील, वरिष्ठांकडून कौतुक होईल. एकूणच सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? सिंह राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह राशीची लव्ह लाईफ (Leo Love Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्या लव्ह लाईफमध्ये फारशा अडचणी येणार नाहीत. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आपल्या प्रियकरासोबत अधिक वेळ घालवा. एकमेकांसोबत राहून काही साहसी गोष्टी करा, साहसी खेळ खेळा, फिरायला जा. या आठवड्यात काही लोकांचं लग्न ठरू शकतं. मागील प्रेमसंबंधांतील समस्या सोडवण्यासाठी आणि आधीच्या प्रियकरासोबत नव्याने प्रेमसंबंध सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. मात्र विवाहितांनी हे करणं टाळावे, यामुळे वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सिंह राशीचे करिअर (Leo Career Horoscope)
व्यावसायिक जीवनात नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. आयटी, हेल्थकेअर प्रोफेशनल, डॉस्पिटॅलिटी, डिझाईन आणि बँकिंग प्रोफेशनल्सना परदेशात काम करण्याच्या ऑफर मिळतील. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना या आठवड्यात मुलाखतीसाठी बोलावलं जाऊ शकतं. ऑफिसमध्ये वरिष्ठांचं सहकार्य मिळेल, त्यामुळे पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता वाढेल. व्यावसायिकांनी व्यवसाय वाढीसाठी नवीन सुवर्ण संधी मिळतील. बिझनेस मीटिंगमध्ये तुमच्या नवीन कल्पना शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका, यामुळे नवीन प्रकल्पांच्या ऑफर येऊ शकतात.
सिंह राशीची आर्थिक स्थिती (Leo Wealth Horoscope)
पैशांच्या बाबतीत शहाणपणाने निर्णय घ्या. काही लोक नवीन मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करू शकतात. या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. भावा-बहिणींमध्ये पैशांबाबत सुरू असलेले वाद संपतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. वडिलोपार्जित संपत्ती विभागली जाऊ शकते. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्राला आर्थिक मदत करावी लागू शकते.
सिंह राशीचे आरोग्य (Leo Health Horoscope)
या आठवड्यात नाक आणि कानाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्येष्ठांनी पायऱ्या चढताना आणि उतरताना विशेष काळजी घ्यावी. जास्त वेगाने गाडी चालवू नका. मधुमेहाच्या रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रोज फिरायला जा, निसर्गात काही क्षण घालवा, यामुळे तुम्ही निरोगी आणि उत्साही राहाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: