एक्स्प्लोर

Horoscope Today 24 June 2023 : मेष, सिंह, मकरसह 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 24 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 24 June 2023 : आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीच्या लोकांना आज नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आजचा शनिवार मेष ते मीन राशींसाठी कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुमची सर्व कामे आज पूर्ण होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही घरबसल्या काही ऑनलाइन काम कराल, ज्यामध्ये तुम्हाला हळूहळू यश मिळेल. आज जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. भावा-बहिणींबरोबर लवकरच एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखा. शेजाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधीही उपलब्ध होतील. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. आज तुमचा एखादा दिर्घकालीन आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप अस्वस्थ वाटेल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. घरगुती जीवनात सुख-शांती राहील. आज तुमच्या मनातील एखादी गोष्ट तुमच्या आई-वडिलांबरोबर शेअर करा. यातून चांगला मार्ग निघू शकतो. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असल्यामुळे तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी वेळ चांगला आहे. दूरच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या आनंदाच्या बातमीने तुम्ही खूप आनंदी दिसाल. आज दिर्घकालीन आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो. तुमच्या जोडीदाराबरोबर नात्यातील तणाव दूर करण्यासाठी दिवस चांगला आहे. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नक्कीच फलदायी असणार आहे. आज तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार दिसून येतील. राजकारणात करिअर करायचे असेल तर वेळ चांगला आहे, नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या मुलाला मिळालेल्या चांगल्या नोकरीमुळे तुम्ही खूप खूश दिसाल. तुम्ही ओळखीच्या व्यक्तींबरोबर धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, जिथे तुम्ही थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आज पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्ही केलेली गुंतवणूक खूप फायदेशीर ठरेल, परंतु तुम्हाला भागीदारांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. वेळेचा सदुपयोग करायला शिका. जर तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तर काहीतरी सर्जनशील करण्याचा प्रयत्न करा. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार लोक नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप खूश होतील. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याचीही चर्चा होऊ शकते. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून काही वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करा आणि त्यांच्या खेळात सहभागी व्हा. आज मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी देखील काळ चांगला आहे. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरामध्ये पूजा, पाठ यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. संध्याकाळी घर पाहुण्यांनी भरलेले असेल. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील, सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. कुटुंबाच्या भल्यासाठी जोडीदाराबरोबर काम करताना दिसाल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. घरात नवीन पाहुण्याचं आगमन होईल. नातेवाईकाच्या मदतीने उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. आज तुम्ही कोणत्याही मदतीशिवाय पैसे कमवू शकाल. सामाजिक उत्सवांमध्ये सहभागी होण्याची संधी आहे, ज्यामुळे तुमचा लोकांशी संपर्क होईल. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायासमोरील अडचणी दूर करू शकाल. मित्र तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने नवीन संपर्क देखील वाढतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याच्या मदतीने अडकलेले पैसे मिळतील. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे एखादे काम अडकले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य तुम्हाला मदत करतील. घरोघरी शुभ कार्यक्रमही आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांचे येणे-जाणे सुरू होईल. तुमच्या वाणीतील गोडव्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. सरकारी क्षेत्रांतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते आज सहज मिळेल. नवीन कामे पूर्ण करण्यासाठी महिला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गेले काही दिवस जे खूप व्यस्त होते, त्यांना आज स्वतःसाठी मोकळा वेळ मिळू शकेल. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरीच्या शोधात इकडे-तिकडे जे फिरत आहेत त्यांना चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. छोट्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या व्यवसायात नफा मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम कराल. मुलांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायासाठी अचानक केलेली सहल सकारात्मक परिणाम देईल. आज तुम्ही मोकळ्या वेळेचा सदुपयोग कराल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुम्ही जे काही काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याचे साधन मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राकडून नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसायातही वाढ होईल. तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याकडून पैसे घेतले असतील तर ते आज परत करा. कामावर लक्ष केंद्रित करा आणि भावनिक गोष्टी टाळा. हा दिवस तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्वात खास दिवसांपैकी एक असू शकतो.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. जे परदेशी व्यापाराशी संबंधित आहेत, त्यांना आज अपेक्षित लाभ मिळू शकतो. याबरोबरच नोकरी व्यवसायाशी संबंधित या राशीचे लोक कामाच्या ठिकाणी आपल्या कौशल्याचा पुरेपूर वापर करू शकतात. मोकळ्या वेळेचा योग्य वापर करायला शिका. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी आहे. आज तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामावर खूश असेल. व्यावसायिकांना व्यवसायात नफाही मिळू शकतो. घरोघरी पूजा-पाठ यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घर, प्लॉट, दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. आज आर्थिक जीवनात समृद्धी येईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 23 June 2023 : मेष, वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित भारतीय वंशाचे महापौर जोहरान ममदानी दोन कुराणांवर हात ठेवत पदाची शपथ घेणार
न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित भारतीय वंशाचे महापौर जोहरान ममदानी दोन कुराणांवर हात ठेवत पदाची शपथ घेणार
Kolhapur Accident: कोल्हापुरात नववर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव इनोव्हानं तिघांना चिरडलं; तावडे हॉटेल परिसरात भीषण अपघात
कोल्हापुरात नववर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव इनोव्हानं तिघांना चिरडलं; तावडे हॉटेल परिसरात भीषण अपघात
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित भारतीय वंशाचे महापौर जोहरान ममदानी दोन कुराणांवर हात ठेवत पदाची शपथ घेणार
न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित भारतीय वंशाचे महापौर जोहरान ममदानी दोन कुराणांवर हात ठेवत पदाची शपथ घेणार
Kolhapur Accident: कोल्हापुरात नववर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव इनोव्हानं तिघांना चिरडलं; तावडे हॉटेल परिसरात भीषण अपघात
कोल्हापुरात नववर्षाच्या सुरुवातीलाच भरधाव इनोव्हानं तिघांना चिरडलं; तावडे हॉटेल परिसरात भीषण अपघात
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवार, प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
Mumbai Rains: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना सरप्राईज; पहाटेपासून पावसाच्या धारा; पुढील 4 दिवस हवामान अंदाज काय?
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना सरप्राईज; पहाटेपासून पावसाच्या धारा; पुढील 4 दिवस हवामान अंदाज काय?
Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांनी आणखी एका वाल्याचा वाल्मिकी केला, पुण्यानंतर पिंपरीत दोन हाफ मर्डरचे गुन्हे असलेल्या सिद्धार्थ बनसोडेंना उमेदवारी, काँग्रेसचा आरोप
अजित पवारांनी आणखी एका वाल्याचा वाल्मिकी केला, पुण्यानंतर पिंपरीत दोन हाफ मर्डरचे गुन्हे असलेल्या सिद्धार्थ बनसोडेंना उमेदवारी, काँग्रेसचा आरोप
Maharashtra Live Blog Updates : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा फक्त एका क्लिकवर...
महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा फक्त एका क्लिकवर...
Embed widget