एक्स्प्लोर

Horoscope Today 24 July 2024 : आज संकष्टी चतुर्थी, हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 24 July 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 24 July 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या. 

मेष रास (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही कामांमध्ये आळस देखील दिसून येईल. 

व्यवसाय (Business) - दुग्धजन्य पदार्थांचा आणि दैनंदिन गरजा असलेल्या गोष्टींचा व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आपली पुस्तकं, नोट्स आणि इतर साहित्य अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवावं, हरवण्याची शक्यता संभवते.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी सावध राहून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे औषधं घेणं आवश्यक आहे.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - जोपर्यंत तुम्ही कामाला सुरुवात करत नाही तोपर्यंत कामावर कोणाचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमची एखादी डील फायनल होऊ शकते.

विद्यार्थी (Student) - तुमची इच्छा नसतानाही आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटचा भाग बनू शकणार नाहीत.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - बँकिंग क्षेत्राशी संबंधित नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला असेल. नोकरदारांना नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक जोडण्यासाठी तुम्ही डिजिटल जाहिरातींची मदत घ्याल. कामात तुमची कार्यक्षमता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल.

विद्यार्थी (Student) - तरुणांबद्दल बोलताना, उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

आरोग्य (Health) - आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी तसेच कामात दिवस चांगला जाण्यासाठी देवाची पूजा आराधना करा. 

व्यवसाय (Business) - आज कोणताही आडपर्दा न ठेवता सगळे एकत्र काम करताना दिसतील. त्यामुळे व्यवसाय देखील चांगला चालेल. 

तरुण (Youth) - पैसे कमावण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात खासकरून सोशल मीडियाचा वापर करत असाल तर त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

आरोग्य (Health) - आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लाईट आहारच घ्या. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही केलेल्या कामाचा आज तुम्हाला लाभ मिळेल. अचानक धनलाभ होईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसायासाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही तुमची जी काही जमापुंजी साठवली होती ती आज खर्च होऊ शकते. 

तरुण (Youth) - आज तुम्ही जे कोणतेही प्लॅन करत असाल ते नीट विचार करूनच करा. तरच तुम्हाला त्यात यश येईल.

आरोग्य (Health) -  जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल. फक्त मनात भीती ठेवू नका. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

नोकरी (Job) - जर तुम्हाला तुम्ही ठरवलेलं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी आजपासूनच तयारीला लागा. तरच तुम्हाला यश मिळेल. 

व्यवसाय (Business) -  व्यापारी वर्गाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्हाला ग्राहकांच्या मागणीनुसार व्यवसायात बदल करायला हवा. तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. 

तरुण (Youth) - जे तरूण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करतायत  त्यांनी आपल्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे.  

आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. फक्त तुमची औषधं वेळेवर घ्या. 

तूळ रास (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणतीच भूमिका घेऊ नका. अन्यथा ऑफिसमधील सहकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. 

आरोग्य (Health) - जे हृदयरोगी आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला छातीत दुखणं, नैराश्य, अस्वस्थपणा यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

व्यवसाय (Business) - आज तुम्हाला व्यवसायात जास्त माणसांची गरज भासू शकते. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची तुम्ही लवकरच निवड करावी. 

प्रेमसंबंध (Relationship) - जर तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीबरोबर तुमच्या भावना शेअर करायच्या असतील तर तुम्ही त्या व्यक्त करू शकतात. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय घेताना तुम्ही कोणतीच घाई-गडबड करू नका. अन्यथा नंतर पश्चाताप होऊ शकतो. 

आरोग्य (Health) - महिलांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. सांधेदुखीचा आजार तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो. 

व्यवसाय (Business) - जर तुमच्या व्यवसायात एखादं महत्त्वाचं काम अनेक दिवसांपासून रखडलं असेल तर ते पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्या. 

युवक (Youth) - आज तुमचे तुमच्या मित्राबरोबर वाद होऊ शकतात. जुन्या गोष्टी पुन्हा बाहेर काढल्या जाऊ शकतात. पण हा वाद जास्त वाढू देऊ नका अन्यथा तुम्ही मैत्री गमवाल. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर तुमचे बॉस खूप खुश असतील. तुम्हाला नोकरीत बढतीची संधी देखील मिळू शकते. 

आरोग्य (Health) - ज्या लोकांना मानदुखीचा त्रास आहे त्यांना आज अस्वस्थ वाटू शकतं. यासाठी थोडा वेळ आराम करा. 

व्यवसाय (Business) - जर तुम्ही कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा. कारण याचा तुमच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

युवक (Youth) - जर तुम्ही एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळू शकतं. 

मकर रास (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आज ऑफिसचं काम करताना घाई करू नका, कारण घाईत केलेलं काम बिघडू शकतं आणि त्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी भांडू शकतात.

व्यवसाय (Business) - आज व्यवसायासाठी तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नये, अन्यथा तो तुमचा विश्वासघातही करू शकतो.

आरोग्य (Health) - तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल. 

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज टेक्नोलॉजीचा वापर करुन ऑफिसचं काम पूर्ण करा, असं केल्याने तुमच्या कामाचा दर्जा सुधारेल. आज वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदी होईल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्याशी नवीन ग्राहक जोडले जातील.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य सामान्य असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आज तुम्हाला जुन्या आजारांपासून आराम मिळेल.

मीन रास (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.

व्यवसाय (Business) - जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्ही आधी चर्चा करा आणि मगच नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवा, कारण तुमचा पार्टनर तुम्हाला पुढे फसवू शकतो. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं, आज तुम्ही तुमचा शाळेचा गृहपाठ पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून ओरडा पडेल.

आरोग्य (Health) - तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 24 July 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी खास; लाभणार बाप्पाची विशेष कृपा, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget