(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 23 October 2024 : कुंभ राशीचा दिवस भाग्याचा; मकर, मीन राशीचा दिवस कसा? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 23 October 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 23 October 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ (Aquarius), मीन राशीचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
मकर (Capricorn Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा कामात थोडा चंचलपणा दाखवा, ऑफिसला पोहोचायला उशीर करू नका.
व्यवसाय (Business) - आज व्यवसायात तुम्हाला थोडं धीराने घ्यावं लागेल, एखादा ग्राहक फसवणूक करू शकतो.
विद्यार्थी (Student) - आज कोणतंही काम नीट जबाबदारीने पार पाडा, एखादी गल्लत होऊ शकते.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य ठणठणीत असेल. कसलीच काळजी करण्याची गरज नाही.
कुंभ (Aquarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आजचा दिवस भाग्याचा आहे. आज तुम्हाला नोकरीत बोनसची किंवा पगारवाढीची शुभवार्ता मिळू शकते.
व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना आज नवीन प्रोजेक्ट मिळतील. आजचा दिवस नफ्याचा असेल, नवीन ग्राहक जोडले जातील.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा, चांगला अभ्यास केला तरच प्रगती होईल.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य चांगलं असेल. कुठलाच त्रास तुम्हाला जाणवणार नाही.
मीन (Pisces Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामावर डोकेदुखी वाढू शकते, एखादा शत्रू तुमच्याविरोधात षडयंत्र रचू शकतो, जपून राहा.
व्यवसाय (Business) - जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर, नवीन प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्याची रिस्क घेऊ नका, सध्या आहे तशीच गाडी चालू द्या.
विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आज अभ्यासाकडे एकाग्रतेने अभ्यास करावा, तरच परीक्षेत चांगले गुण मिळतील.
आरोग्य (Health) - आज तुम्हाला थोडा मानसिक त्रास जाणवेल. जास्त विचार करू नका. योगा, व्यायाम करुन दिवस घालवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :