एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Horoscope Today 19 April 2023 : आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 April 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 19 April 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरातही जाता येईल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. आज तुम्हाला मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. मेष ते मीन राशीसाठी बुधवार कसा राहील, काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज मेष राशीच्या लोकांचे नशीब आज तितके साथ देत नाही. आज तुमच्या रागावर आणि तुमच्या वागण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वरिष्ठ अधिकार्‍यांपासून तुम्हाला ऐकावे लागेल, तसेच कामाचे नुकसान होऊ शकते. परंतु हळूहळू परिस्थिती सुधारेल. तुम्ही मित्रांसह लांब सहलीवर जाण्याची योजना करू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील. नवीन कामात यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. भावंडांच्या सल्ल्याने कौटुंबिक व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या प्रेम जीवनात नवीन अध्याय सुरू होईल आणि सामाजिक कार्यात पुढे गेल्याने तुम्हाला सन्मान मिळेल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन योजनांकडे तुम्ही लक्ष द्याल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. जे सरकारी नोकरी करत आहेत, त्यांना आज आपल्या अधिकार्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. आज, तुम्ही स्वत:ला अनेक कामांमध्ये गुंतवून घ्याल. भावंडांच्या नात्यात गोडवा राहील. संध्याकाळची वेळ समाजबांधवांसाठी असेल. वृत्तपत्रे किंवा प्रसारमाध्यमांशी संबंधित असलेल्यांना आज अधिक मेहनत करावी लागेल. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही बाबतीत चांगला तर काही बाबतीत वाईट असू शकतो. आज सकाळपासूनच किरकोळ लाभ होण्याची शक्यता आहे. आई आणि वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. जर तुम्हाला आज नवीन काम सुरू करायचे असेल तर कठोर परिश्रमानंतर तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वरिष्ठांची मदत घ्यावी लागू शकते. राजकारणाशी संबंधित कामांमध्ये दिवस चांगला जाईल. संध्याकाळचा वेळ मित्र आणि कुटुंबियांसोबत घालवा.  नोकरी-व्यवसायाशी संबंधित समस्याही आज सुटतील. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चाचा असेल. जर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल तर तुमच्या पैशांमुळे थांबलेली इतर कामे पूर्ण होतील. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता आपले काम करत राहिल्यास येणाऱ्या काळात यश तुमच्याबरोबर असेल. आज तुम्ही तुमच्या सामाजिक क्षेत्रात सुसंवाद वाढवू शकाल. आज विवाहित लोकांसाठी काही चांगले प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना आज स्पर्धा परीक्षांमध्ये कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागू शकतो. 

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभाचा आहे. तुम्हाला तुमच्या वडिलांचा आशीर्वाद मिळेल आणि तुमची संपत्तीतही वाढ होईल. भावंडांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध राहा. धार्मिक कार्यात खर्च केल्याने आज तुमची कीर्ती वाढेल आणि तुमचा मान-सन्मानही वाढेल. नवीन यश मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील, ज्यामुळे तुम्हाला नंतर खूप फायदा होईल. आज अनोळखी व्यक्तीसोबत पैशाचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज विद्यार्थी त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी योग्य क्षेत्र निवडतील, जे त्यांच्या भविष्यासाठी चांगले परिणाम देईल. कौटुंबिक परिस्थिती अनुकूल राहील आणि तुमच्या जोडीदाराचे सहकार्य तुम्हाला कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करेल, ज्यामुळे तुमच्या मनात प्रेमाची भावना वाढेल. संध्याकाळी परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वादाचा प्रश्नही हळूहळू सुटताना दिसत आहे. आज कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहा. प्रतिकूल परिस्थिती आल्यावर रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा प्रकरण वाढेल. 

तूळ

आज तूळ राशीच्या लोकांचा दिवस आनंदात जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे पद आणि अधिकार वाढतील. आज तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात सरप्राईझ भेट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे योग्य निराकरण न झाल्याने ते अस्वस्थ राहतील. आज कुटुंबीयांसह सहलीला जाण्याची शक्यता आहे. वडिलांचे सहकार्य आज लाभदायक ठरेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. न्यायालयीन खटले आज तुमच्या बाजूने येण्याची दाट शक्यता आहे. आज तुमची धार्मिक कार्यात रुची वाढेल, तसेच तुम्ही धार्मिक कार्यात भाग घ्याल. 

वृश्चिक

आज वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस आहे. प्रेम जीवनात नवीन उर्जेचा संचार होईल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज कुटुंबातील सर्व सदस्य कोणत्याही शुभ कार्यक्रमाच्या विशेष तयारीमध्ये सहभागी होऊ शकतात, ज्यामध्ये खर्च देखील जास्त असेल. आज तुम्हाला व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. कोणत्याही सरकारी संस्थेतून दूरगामी लाभ मिळण्याची आज शक्यता निर्माण होईल. अचानक संध्याकाळी मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना आज एकाग्रता ठेवावी लागेल, तरच यश मिळण्याची शक्यता आहे. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यवृद्धीचा आहे. भविष्य मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी केलेले प्रयत्न आज कामी येतील. आज तुमचे काही नवीन संपर्क वाढतील.  परंतु, दैनंदिन कामात हलगर्जीपणा करू नका. सरकारी कामांनाही आज गती मिळेल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुम्हाला एखाद्या विशेष कार्यक्रमांतर्गत अडकलेले पैसे मिळतील. तुमचे मन प्रसन्न राहील, तुमचा कल आज श्रद्धा, धर्म आणि अध्यात्माकडे जाईल. समाजसेवेशी निगडित विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा आज वाढेल आणि तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल.

मकर

मकर राशीच्या लोकांचा दिवस प्रेम आणि सहकार्याने भरलेला असेल. वैवाहिक जीवनातही सौम्यता राहील. तुमच्या पराक्रमात वाढ झाल्यामुळे शत्रूंचे मनोबल खचलेले दिसेल. अचानक पाहुण्यांच्या आगमनाने मन प्रसन्न राहील, परंतु आज तुम्हाला नकारात्मक विचार टाळावे लागतील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. आज कुटुंबातील वरिष्ठांशी भविष्यातील योजनांवर चर्चा करा. आज तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आज कार्यक्षेत्रात कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद होणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. केवळ आपल्या कामात लक्ष द्या, अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. 

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांचा आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. भावंडांशी बोलून सर्व मतभेद दूर होतील. कामाच्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात. आज जमीन आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. आज सरकारी नोकऱ्या असलेल्या लोकांसाठी बदलीची शक्यता निर्माण झाली आहे. कौटुंबिक सुखांचा उपभोग घ्याल. प्रिय घरगुती वस्तूंची खरेदी करता येईल. जीवाणूजन्य आजारांपासून सावध राहणे आवश्यक आहे. जुने व्यावसायिक संबंध तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी देतील. प्रेम जीवनात आज नवीन ताजेपणा जाणवेल. आज व्यवसायात कौटुंबिक संबंधांचे पूर्ण सहकार्य मिळेल. 

मीन

मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यात होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. आज तुम्हाला जमीन आणि इमारतीशी संबंधित प्रकरणांमध्ये थोडा दिलासा मिळेल. क्षेत्रात काही विशेष यश मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील, परंतु हवामानातील बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्याची विशेष काळजी घ्या. प्रेम जीवनात आज गोडवा राहील आणि इतरांनाही समजून घेण्याचा प्रयत्न कराल. तुमची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे, तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज जोडीदाराच्या भावनांची पूर्ण काळजी घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Horoscope Today : सिंह, तूळ आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaShahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :12 PM : 28 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaPriyanka Gandhi- Ravindra Chavan Oath : प्रियंका गांधी , रवींद्र चव्हाणांनी घेतली खासदारकीची शपथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Actress Charge 5 Crore For Song : 'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
'आज की रात' साठी तमन्नाच्या एक कोटीची चर्चा, पण फक्त चार मिनिटाच्या आयटम साँगसाठी पाच कोटी घेणाऱ्या अभिनेत्रीची रंगली भलतीच चर्चा!
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना कॉल, एक महिला ताब्यात
Ajay Jadeja and Madhuri Dixit : सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
सगळं काही सुरळीत असतानाच धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अजय जडेजाच्या नात्यात माशी कुठं शिंकली? लग्न होता होता का थांबलं??
Petrol-Diesel Price: पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
पेट्रोल डिझेलवरील करातून 5 वर्षात केंद्र अन् राज्य मालामाल,  36 लाख कोटींची कमाई, कुणाला किती पैसे मिळाले? 
Embed widget