एक्स्प्लोर

Horoscope Wednesday 18th october 2023 : मेष, तूळ, धनु राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Wednesday 18th october 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Wednesday 18th october 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांनी आज कोणत्याही वादात पडू नये. तर, वृश्चिक राशीच्या लोकांनी व्यवहारात सावधानता बाळगावी. एकूणच इतर राशीच्या लोकांसाठी आजचा बुधवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय करणारे लोक आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील. तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप यश मिळू शकते. नोकरदार लोकांच्या कामावर वरिष्ठ अधिकारी फार खुश होतील. आज तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ चांगला असेल. तुम्ही तुमच्या अभ्यासात खूप मेहनत कराल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हलक्या हवामानात होणाऱ्या बदलांमुळे त्रास होऊ शकतो. मुलांमुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुमच्या जोडीदाराच्या बाजूने तुमचे मनही समाधानी राहील. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. आज तुम्ही तुमचा बराचसा वेळ तुमच्या कुटुंबीयांना देऊ शकाल. यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. तुमची प्रकृती थोडी बिघडलेली राहील. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. नोकरी करणार्‍या लोकांची ऑफिसमध्ये मान-प्रतिष्ठा वाढू शकते. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मन समाधानी राहील.  

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्हाला तुमचे मित्र अचानक भेटतील त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. काही गोष्टी शेअर केल्या जातील. नोकरदार वर्गाला नोकरीत बढतीची शक्यता आहे. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल तुम्ही खूप आनंदी असाल. आज मात्र तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा असेल. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, जिथे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. तुम्ही तुमच्या घरी काही हवन, कीर्तन वगैरेही करू शकता. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव लवकरच येऊ शकतात. तुमच्या घरात काही शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी, मंदिरात जा आणि स्वतःला काही क्षण विश्रांती द्या. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आज कुटुंबीयांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला बर्याच काळापासून काही दीर्घकालीन समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज तुमच्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या व्यवसायातील इतर सर्व गोष्टींमधून नफा मिळेल. आज तुमचे आरोग्य काहीसे कमजोर राहील, त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सकाळी लवकर मॉर्निंग वॉक करा. तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, काही योगासने करण्यासाठी वेळ काढा. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप मेहनतीचा असेल. तुमच्या कुटुंबातही आनंदाचं वातावरण असेल. तुमची व्यवसायात खूप चांगली प्रगती होईल. जोडीदाराचाही पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमचे आरोग्य आज सामान्य राहील. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जे व्यवसाय करत आहेत, त्यांना व्यवसाय पुढे नेण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. नवीन संपर्क वाढतील. तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला हळूहळू मिळतील. तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराबरोबर धार्मिक स्थळाला भेट देण्याचा बेत होईल. मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. एखाद्या खास व्यक्तीसोबत भेटही होईल. एखादे काम करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर वेळ चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. घर, फ्लॅट, दुकान खरेदी करण्यासाठी तुम्ही ज्या योजना आखत होतात त्यात तुम्हाला यश मिळेल. 

वृश्चिक

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, त्यांच्यासोबत मजा करा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील, ज्यामुळे व्यवसायात यश मिळेल.

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असल्याने नोकरदार लोकांना थोडा त्रास होईल. धीर धरा कारण तुमची समज आणि प्रयत्न तुम्हाला नक्कीच यश मिळवून देतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करा. आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्यास पालक खूप आनंदी दिसतील. तुम्ही शेजारच्या परिसरात होणार्‍या पूजा-पाठात सहभागी व्हाल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बराच वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेळेवर पूर्ण करू शकणार नाही. नोकरदारांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. तुम्हाला अचानक प्रवासाला जावे लागू शकते. प्रवास तुमच्यासाठी ठीक राहील. अनोळखी व्यक्तीची भेटेल. कोणाच्याही सल्ल्याने पैसे गुंतवू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकते. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल. रोजच्या दिनचर्येत मॉर्निंग वॉक आणि योगा यांचा समावेश करा. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, तुम्हाला आर्थिक लाभ होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैसे कसे वाचवायचे ते तुम्ही तुमच्या वडिलांकडून शिकून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. घर, फ्लॅट घेण्याचे नियोजन होते, ते यशस्वी होईल. नवीन वाहनाचा आनंदही मिळू शकतो. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल.

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना भरपूर नफा मिळेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसेल. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक सदस्यांबरोबर तुम्ही काही धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना करा. समाजाच्या हितासाठी केलेल्या कार्याचा सन्मान मिळेल. घरामध्ये पूजा, पाठ आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांची ये-जा सुरु असेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Tuesday 17 October 2023 : मेष, धनु, मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Neelam Gorhe: एकीकडे ठाकरे गटातील नेते तुटून पडले दुसरीकडे शिंदे गटातील नेतेही नीलम गोऱ्हेंवर नाराज,  म्हणाले...
विनाकारण पक्ष डॅमेज झाला! शिंदे गटातील नेते नीलम गोऱ्हेंवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे महत्त्वाची मागणी
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार, महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज येणार, तुमचं बँक अकाऊंट फटाफट चेक करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सThreat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 25 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMassajog Protest : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी एल्गार, मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Neelam Gorhe: एकीकडे ठाकरे गटातील नेते तुटून पडले दुसरीकडे शिंदे गटातील नेतेही नीलम गोऱ्हेंवर नाराज,  म्हणाले...
विनाकारण पक्ष डॅमेज झाला! शिंदे गटातील नेते नीलम गोऱ्हेंवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे महत्त्वाची मागणी
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार, महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज येणार, तुमचं बँक अकाऊंट फटाफट चेक करा
Thane Crime: ठाण्यात गतीमंद मुलीला वेदना असह्य, आई अन् आजीने गुंगीच्या गोळ्या देऊन मारुन टाकलं, साताऱ्यातील गावी नेऊन अंत्यसंस्कार उरकले
गतिमंद मुलीच्या वेदना पाहावल्या नाहीत, आई -आजीने झोपेच्या गोळ्या देऊन कायमचं 'शांत' केलं; ठाण्यातील घटना
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी होणार सुनावणी; आमदार अपात्रतेला स्थगिती मिळणार?
माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी होणार सुनावणी; आमदार अपात्रतेला स्थगिती मिळणार?
Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून गंभीर दखल, ग्रामसेवकाला धाडली नोटीस
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून गंभीर दखल, ग्रामसेवकाला धाडली नोटीस
Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 435000 कोटी बुडाले, FPI कडून जोरदार विक्री सुरुच
गुंतवणूकदारांसाठी आठवड्याचा पहिलाच दिवस ब्लॅक डे ठरला, 435000 कोटी बुडाले, FPI कडून जोरदार विक्री सुरुच
Embed widget