Horoscope Today 16 September 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीला मिळणार गोड बातमी, आयुष्यात घडतील सकारात्मक बदल; आजचे राशीभविष्य
Horoscope Today 16 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार कसा राहील? कर्क, सिंह, कन्या राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 16 September 2024 : पंचांगानुसार, आजचा दिवस सोमवार. हा जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. एकूणच आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ राहणार आहे तर कोणत्या राशींसाठी अशुभ राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा आठवड्याचा पहिला दिवस म्हणजेच सोमवार कसा राहील? कर्क, सिंह, कन्या राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमची प्रगती होईल.
व्यापार (Business) - आज तुम्हाला व्यापाऱ्याशी संबंधित तोटा होऊ शकतो. अशा वेळी जास्त ताण न घेता कामाचाच एक भाग म्हणून सोडून द्या.
तरूण (Youth) - घराबाहेर पडताना घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी आशीर्वाद घ्या. तुमची सगळी कामं पूर्ण होतील.
आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. पण म्हणून तुम्ही तुमच्या जुन्या दिर्घकाली आजाराकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह रास (Leo Horoscope Today)
नोकरी (Job) - तुम्हाला आज कदाचित प्रमोशनची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल.
व्यापार (Business) - आज व्यवसायात कोणताही मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. वरिष्ठांचा योग्य सल्ला घ्या.
तरूण (Youth) - आज तुमचं पूर्णपणे लक्ष समाजसेवा करण्यात असू शकतं. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल.
आरोग्य (Health) - तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. ऑफिसमधलं वातावरणही चांगलं राहील.
व्यापार (Business) - जर तुम्ही व्यवसायात काही नवे बदल आणू इच्छित असलात तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल.
तरूण (Youth) - प्रेमसंबंधात तुमचं सगळं व्यवस्थित सुरु राहणार आहे. तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.
आरोग्य (Health) - दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: