एक्स्प्लोर

Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

Harishchandra Chavan passed away : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी निधन झाले आहे. 

नाशिक : एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु आहे. त्यातच आता भाजपसाठी (BJP) एक वाईट बातमी समोर येत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे (Dindori Lok Sabha Constituency) माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) यांचे आज सकाळी निधन झाले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रकृती बरी नव्हती. आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, येथेही त्यांनी पदे भूषवली, दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सने ते दिल्ली येथे गेले होते. भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नव्हते. मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते.  

दिंडोरीतून दोन वेळा खासदार

हरिश्चंद्र चव्हाण यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2014 मध्ये त्यांनी भारती पवार यांचा 2 लाख 47 हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या होत्या. दरम्यान, 2019 मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र पवार यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी 1 लाख 98 हजार 779 मतांनी विजय मिळवला होता. 

2024 सालच्या लोकसभेसाठी होते इच्छुक  

यानंतर 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक होते. मात्र, भाजपने भारती पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांना दिंडोरी लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र,आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे म्हणत त्यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी मागे घेतली होती. नाशिकच्या पिंपळगाव येथे लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत देखील हरिश्चंद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती.  आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन झाल्याने दिंडोरीवर शोककळा पसरली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा

Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Embed widget