उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
मालेगावकडे येतांना माझी बॅग तपासणी केली. माझ्या आधी धुळे विमानतळावर संजय राऊत यांच्या बॅग तपासणी झाली नाही? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. असंही त्या म्हणाल्या..
Jyoti Waghmare on Udhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांना आता अवघे पाच दिवस राहिले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाकडून बॅग तपासणीवरून राज्यात सतत खटके उडताना दिसताना शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोक्यातली मनुस्मृती गेली नाही का? असा सवाल करत उद्धवजी थोड्या दिवसांनंतर तुमची बॅग नव्हे तर तुमचं डोकं तपासण्याची वेळ येईल. त्यामुळे सावध रहा असं म्हणत अधिकाऱ्याला मागासवर्गीय सरकारी दफ्तरातील कर्मचाऱ्याला तुच्छतेने वागणूक दिल्याचा ठपका ठेवत जोरदार टीका केलीय. बॅगतपासणीवरून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. नाशिकमधील मालेगावमध्ये पत्रकारपरिषदेत त्या बोलत होत्या.
उद्धव ठाकरेंच्या मनात अजून मनुस्मृती
उद्धव साहेबांनी जे अधिकाऱ्याला त्याचे नाव विचारले तो अधिकारी मागासवर्गीय किंवा आदिवासी असल्याचे समजताच तू माझे युरीन पॉट सुद्धा तपास अशा पद्धतीने त्या कर्मचाऱ्याला तुच्छतेने वागणूक दिली असा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या डोक्यातली मनुस्मृति गेलेली नाही का? असा सवाल ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंना केला.
माजी मुख्यमंत्र्यांनी बालिश पद्धतीनं विचारपूस करणं म्हणजे..
आपण नेहमी दलित आणि मागासवर्गीय लोकांबद्दल असे विधान करतात. माणुसकीला काळीमा फासणारी विधाने करतात. आपल्याला फक्त मातोश्री मधल्या आय स्पेसची लाईफची माहिती आहे. सरकारी अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल केला जातो आणि कार्ड तो फोटो असे बघून घेऊ अशा धमक्या देत आहेत. तुमच्या अशा वागण्यामुळे त्या अधिकाऱ्याची कुटुंब भीतीच्या सावटाखाली असणार नाही का? असा सवालही त्यांनी केला. एखाद्या माजी मुख्यमंत्र्यांनी अशा बालिश पद्धतीने विचारपूस करणे हे खरंच संविधानिक नाही असंही त्या म्हणाल्या.
इतकी घाण तुमच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये साचली कशी?: ज्योती वाघमारे
उद्धव ठाकरे यांच्यातील फोटोग्राफर काल सुद्धा जागा झाला. कुठलाही कर्मचारी असला तरी त्याला आपण लघवीचे भांड तपास असं सांगणार का.. ही भाषा योग्य आहे का? इतकी घाण तुमच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये साचली कशी? असा सवाल ज्योती वाघमारेंनी केला.उद्धवजी थोड्या दिवसानंतर तुमची बॅग नव्हे तर तुमचं डोकं तपासण्याची वेळ येईल. त्यामुळे सावध व्हा..
बॅग तपासली तर उद्धवजींना राग का येतो?
मालेगावकडे येतांना माझी बॅग तपासणी केली. माझ्या आधी धुळे विमानतळावर संजय राऊत यांच्या बॅग तपासणी झाली नाही? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. मालेगाव चेक पोस्ट वर देखील माझ्या बॅग ची तपासणी केली पण तिथे पुरुष कर्मचाऱ्यांनी माझी बॅग तपासणी केली. महिलांच्या बॅग तपासणी साठी महिला कर्मचारी पाहिजे. प्रत्येक चेक पोस्ट वर महिला कर्मचारी नेमावी अशी मागणी. सरकारी यंत्रणेला सहकार्य करावे त्यांचे काम त्यांना करू द्यावे. मुख्यमंत्री आणि दोघं उपमुख्यमंत्री यांचे देखील बॅगा तपासणी केली जाते. आज उद्धव साहेबांची गाडी चे पोस्ट अडवली तर त्यांना राग का येतो..? असा सवाल ज्योती वाघमारे यांनी केला.