एक्स्प्लोर

Horoscope Today 16 February 2025 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 16 February 2025 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 16 February 2025 : आज 16 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चढ-उतारांचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तसेच, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात लक्ष द्यावं लागेल. तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. तसेच, जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही असणार आहे. आज शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना तुम्हाला खूप विचार करावा लागेल.  तसेच, आज दिवसभरात तुम्हाला एखादी मोठी बातमी ऐकायला मिळू शकेल. आज रविवार असल्या कारणाने कामाच्या प्रती तुम्हाला ताण जाणवणार नाही. सुट्टीचा आनंद घ्याल. आरोग्याची काळजी घ्या. 

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आरोग्यावर थोडं लक्ष केंद्रित करावं लागेल. तसेच, जर तुम्ही व्यवसायात एखादी जोखीम हाती घेतली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आज दूरचे नातेवाईक तुमच्या घरी भेटीसाठी येऊ शकतात. तरुणांना लवकरच नवीन नोकरी मिळेल. 

कर्क रास (Cancer Today Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित फलदायी स्वरुपाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. तुमच्या वागण्यामुळे इतरांची मनं दुखावू शकतात. तसेच, संध्याकाळी तुमचा वेळ धार्मिक कार्यात जाईल. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तसेच, सकारात्मक विचार तुमच्या मनात येतील. 

सिंह रास (Leo Today Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या जवळच्या लोकांबरोबर तुमच्या गाठीभेटी होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आज घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

कन्या रास (Virgo Today Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती पाहायला मिळेल. तुमचे आरोग्य चांगले असेल. 

तूळ रास (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. कुटुंबातील व्यवहारात लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, व्यावसायिकांना आपल्या कामात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. मित्रांच्या सहवासाने तुम्ही कार्य पूर्ण करु शकाल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope) 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी स्वरुपाचा असणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात अनेक दिवसांपासून सुरु असलेली डील फायनल करण्याची संधी मिळेल. तसेच, कुटुंबात एखाद्या सदस्याच्या लग्नात येणारे अडथळे लवकरच दूर होतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुमच्या उच्च शिक्षणातील मार्ग मोकळे होतील. 

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्ही तुमच्या दिनश्चर्येला अधिक चांगल्या प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे अनेक आजार तुमच्यापासून दूर होतील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 16 February 2025 : आज रविवारचा दिवस 3 राशींसाठी ठरणार वरदान, अपेक्षित फळ लवकरच मिळणार; वाचा आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi 2026: बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व.... 
बाप्पा येतायत...गणेशोत्सव 'या' तारखेपासून सुरू! 3 शुभ योगात साजरा होणार उत्सव, अनंत चतुर्दशी कधी? सर्व तारखा, शुभ मुहूर्त, महत्त्व.... 
Weekly Lucky Zodiac Signs: पैसा..नोकरी..इच्छापूर्ती..पुढचे 7 दिवस 5 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! सूर्य-गुरू ग्रहांची पॉवरफुल युती, सुखद बदलांचा अनुभव, तुमची रास?
पैसा..नोकरी..इच्छापूर्ती..पुढचे 7 दिवस 5 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! सूर्य-गुरू ग्रहांची पॉवरफुल युती, सुखद बदलांचा अनुभव, तुमची रास?
Amavasya 2026: आजची 'भौमवती' अमावस्या अत्यंत खास! दुर्मिळ योगायोग जुळले, 5 राशींचं भाग्य फळफळलं, शुभ योग, मुहूर्त, महत्त्व 
आजची 'भौमवती' अमावस्या अत्यंत खास! दुर्मिळ योगायोग जुळले, 5 राशींचं भाग्य फळफळलं, शुभ योग, मुहूर्त, महत्त्व 
Horoscope Today 14 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागमील क्रोनोलॉजी सांगितली
अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागमील क्रोनोलॉजी सांगितली
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजवत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
Sunetra Pawar NCP Crisis: सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी....
सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी...
Embed widget