(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 08 September 2024 : मीन राशीसाठी दिवस चांगला, तर मकर, कुंभ राशीच्या लोकांनी 'ही' काळजी घ्यावी; वाचा राशीभविष्य
Horoscope Today 08 September 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 08 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horosope Today) जाणून घ्या...
मकर रास (Capricorn Horoscope Today)
नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला सतत जास्त मेहनत करावी लागू शकते. यामुळे तुम्हाला सतत सांधेदुखी जाणवू शकते.
आरोग्य (Health) - आज घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आजारणामुळे सतत चिंता, थकवा यांरखे त्रास तुम्हाला उद्बवू शकतात.
व्यवसाय (Business) - आज पूर्णपणे तुमचं तुमच्या कामावर लक्ष असेल. पैसे कसे कमावायचे हाच विचार तुम्ही कराल.
तरूण (Youth) - तरूण विद्यार्थ्यांचा ओढा नोकरीपेक्षा जास्त व्यवसायाकडे वळताना दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
नोकरी (Job) - आज तुम्हाला ऑफिसमध्ये चांगला मान-सन्मान मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.
आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याची तुम्ही जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा, सर्दी, खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
तरूण (Youth) - स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षेत चांगलं यश मिळवतील. तसेच चांगली नोकरीही करतील.
कुटुंब (Family) - आज दूरच्या नातेवाईकांडून तुम्हाला चांगली शुभवार्ता मिळू शकते.
मीन रास (Pisces Horoscope Today)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळू शकतो.
आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका.
व्यवसाय (Business) - तुमचा व्यवासाय आहे त्यापेक्षा पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहभाग मिळेल.
तरूण (Youth) - तरूणांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे वाहन चालवताना जास्त वेगाने गाडी चालवू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: