Hindu Religion: पती-पत्नीच्या 'या' एका चुकीमुळे 'तृतीयपंथीय' मुलाचा जन्म होतो? त्यांचा जन्म कसा होतो? पुराण आणि धर्मग्रंथांत म्हटलंय..
Hindu Religion: तृतीयपंथीयांना पाहून तुमच्या मनातही हा प्रश्न नक्की येत असेल की, त्यांचा जन्म कसा होतो? पती-पत्नी अशी कोणती चूक करतात, ज्यामुळे निसर्गाने तृतीयपंथीय मुलाचा गर्भ निर्माण केला?
Hindu Religion: आपण जेव्हा जेव्हा तृतीयपंथीयांना पाहतो, तेव्हा अनेकांच्या मनात पहिला प्रश्न हाच येतो, की यांचा जन्म कसा होत असेल? अशी काय चूक होते? ज्यामुळे तृतीयपंथीय बाळाचा जन्म होतो. आपल्या समाजात पुरूष आणि स्त्री व्यतिरिक्त आणखी एक लिंग आहे, ज्यांना तृतीयपंथीय, किन्नर, किंवा ट्रान्सजेंडर म्हणून ओळखले जाते. ते पूर्णपणे पुरुष किंवा पूर्णपणे स्त्री नाहीत, त्यांना समाजात तृतीय लिंग म्हणून ओळखले जाते. स्पष्टपणे सांगायचे तर, त्यांचा पोशाख कधीकधी स्त्रीसारखा असतो आणि त्यांचे गुण पुरुषासारखे असतात. त्याच वेळी, असेही घडते की, शरीर पुरुषाचे असून ते स्त्रियांसारखे वागताना दिसतात. तृतीयपंथीयांना पाहून तुमच्या मनातही हा प्रश्न नक्की येत असेल की, त्यांचा जन्म कसा होतो? पती-पत्नी अशी कोणती चूक करतात, ज्यामुळे निसर्गाने तृतीयपंथीय मुलाचा गर्भ निर्माण केला? शास्त्रात काय म्हटलंय? जाणून घ्या..
पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये नमूद
तृतीयपंथीय म्हणजेच ट्रान्सजेंडर्सच्या जन्माशी संबंधित प्रश्न आणि त्यांच्याविषयी पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेल्या तथ्यांवर चर्चा करण्यात आली आहे. यासोबतच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तृतीयपंथीयांचा जन्म कसा होतो? त्याच्याशी कोणत्या धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय विश्वासांचा संबंध आहे? जाणून घ्या..
एका शापामुळे अर्जुनही झाला तृतीयपंथीय?
पुराणात आणि धर्मग्रंथात तृतीयपंथीयांचा उल्लेख आहे. महाभारतातही उर्वशीच्या शापामुळे अर्जुन काही काळासाठी तृतीयपंथीय झाला. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार गर्भधारणेच्या वेळी मुलाच्या कुंडलीत काही ग्रहांची विशेष स्थिती असेल तर गर्भ तृतीयपंथीय होऊन तो तृतीयपंथीय म्हणून जन्माला येऊ शकतो. शास्त्रानुसार मागील जन्माच्या कर्माचे फळ हे देखील तृतीयपंथीय होण्याचे कारण मानले जाते.
...म्हणून गरोदर महिलांनी गरोदरपणात सर्व चाचण्या करून घ्याव्यात
आजच्या वैज्ञानिक युगात अल्ट्रासाऊंड सारख्या तंत्रज्ञानाने गर्भाशयात असलेल्या बाळाचे लिंग आधीच कळू शकते, ज्यामुळे गर्भधारणेदरम्यान होणारी कोणतीही संभाव्य समस्या टाळता येते. त्यामुळे गरोदर महिलांनी गरोदरपणात सर्व चाचण्या करून घ्याव्यात असे सुचवले जाते.
वैज्ञानिकदृष्टीकोन पाहिल्यास, तृतीयपंथीय कसा जन्माला येतो?
वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास, स्त्रियांमध्ये X-x गुणसूत्र आणि पुरुषांमध्ये x-y असतात, त्यांचे मिलन भ्रूण बनवते. जेव्हा स्त्रीचे अशा स्थितीत क्रोमोजम डिसऑर्डरमुळे तृतीयपंथीयाचा जन्म होतो. यासाठी क्रोमोजम ज्याला गुणसूत्र म्हणतात, हे समजून घेणे आवश्यक आहे. हे अंडाशय आणि शुक्राणूंमध्ये असतात. शुक्राणू आणि अंड्याच्या मिलनातून मूल म्हणजेच गर्भाशयात गर्भ तयार होतो. वैद्यकीय शास्त्रानुसार, हे चयापचय विकारामुळे होते. हा एक अनुवांशिक विकार आहे ज्यामध्ये क्रोमोसोम डिसऑर्डर होण्याची समस्या आहे, या विकारामध्ये, पुरुषामध्ये y गुणसूत्राच्या दोन अतिरिक्त प्रती असतात, ज्यामुळे xyyy गुणसूत्र एकत्र होतात, ज्याला जन्म दोष आणि तृतीय लिंग म्हणतात. आणि तृतीयपंथीय जन्माला येतो. हे मूल जन्माच्या वेळी अस्पष्ट जननेंद्रियासह जन्माला येते.
हेही वाचा>>
Kumbh Mela 2025: पुरुषांप्रमाणे महिला नागा साधू खरंच विवस्त्र जीवन जगतात? अनेक कठीण परीक्षा, तप अन् नियम.. एक धक्कादायक वास्तव
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)