Hindu Religion: तृतीयपंथीयांच्या जीवनाशी संबंधित 'अशी' रहस्य, अनेकांना माहित नाही, प्रभू रामाकडून मिळाले 'हे' वरदान!
Hindu Religion: असे म्हणतात की, तृतीयपंथीयांकडून मिळालेले आशीर्वाद आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे असतात. त्यांची प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. जाणून घ्या त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी.
Hindu Religion: आपल्या समाजात स्त्री-पुरूष यांच्या व्यतिरिक्त असा एक समाज आहे. जो भारतीय समाजाचा एक महत्त्वाचा भाग म्हटला जातो. ज्याला किन्नर म्हणजेच तृतीयपंथीय असेही म्हणतात, हिंदू धर्मानुसार, तृतीयपंथीयांचा विशेषत: शुभ कार्यात समावेश केला जातो. कोणताही शुभ समारंभ असो, मग ते लग्न असो, मुलाचा जन्म असो किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी, तृतीयपंथीयांची उपस्थिती आणि त्यांचे आशीर्वाद नेहमीच महत्त्वाचे मानले जातात.
तृतीयपंथीयाचे आशीर्वाद आणि शाप
असे म्हटले जाते की, त्यांच्या आशीर्वादमुळे लोकांचे जीवन आनंदाने भरते आणि त्याच्या शापांचा देखील खोल प्रभाव पडतो. असे मानले जाते की त्यांची प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. आज आम्ही तुम्हाला तृतीयपंथीयांशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्या कदाचितच कुणाला माहित असतील.
प्रभू रामाकडून वरदान मिळाले!
पौराणिक कथेनुसार तृतीयपंथीयांच्या आशीर्वादामागे भगवान रामाचे वरदान दडलेले आहे. भगवान श्रीराम वनवासासाठी जात असताना किन्नर समाजही त्यांच्यासोबत गेला होता. पण प्रभू रामाने त्यांना परत येईपर्यंत तिथे थांबायला सांगितले. तृतीयपंथीयांनी 14 वर्षे याच ठिकाणी रामाची वाट पाहिली. त्यांच्या भक्ती आणि निष्ठेने प्रसन्न होऊन, प्रभू रामाने त्यांना आशीर्वाद दिला की त्यांचे आशीर्वाद कधीही व्यर्थ जाणार नाहीत. त्यामुळे तृतीयपंथीयांचे आशीर्वाद इतके महत्त्वाचे मानले जातात.
तृतीयपंथीयांना श्रृंगाराच्या वस्तू द्या
तृतीयपंथीयांना खूश करण्यासाठी लोक त्यांना अनेक वस्तू भेट म्हणून देतात. असे मानले जाते की त्यांना श्रृंगाराच्या वस्तू दिल्याने पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनात सुख आणि समृद्धी येते. तसेच लाल साडी आणि अन्नधान्य दान केल्याने घरामध्ये समृद्धी आणि ऐश्वर्य वाढते. कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम आणि सामंजस्य वाढते.
या गोष्टी चुकूनही तृतीयपंथीयांना देऊ नका
तृतीयपंथीयांना काही वस्तू भेट देणे अशुभ मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार त्यांना स्टीलची भांडी, जुने कपडे, तेल, प्लास्टिकच्या वस्तू देऊ नयेत. यामुळे अपघात किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
तृतीयपंथीय समाज मुलाच्या जन्माचा उत्सव साजरा करतो
हिंदू धर्मात तृतीयपंथीयांना अत्यंत पवित्र मानले जाते. एखाद्या कुटुंबात तृतीयपंथीय मुलाचा जन्म झाला की, संपूर्ण हा समाज मोठ्या थाटामाटात तो साजरा करतो. नाचणे, गाणे, उत्सव साजरा करणे आणि खाणेपिणे हा या आनंदाचा भाग आहे.
हेही वाचा>>
Hindu Religion: पती-पत्नीच्या 'या' एका चुकीमुळे 'तृतीयपंथीय' मुलाचा जन्म होतो? त्यांचा जन्म कसा होतो? पुराण आणि धर्मग्रंथांत म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)