Hartalika 2023 : महिलांसाठी महत्त्वाचा सण, हरतालिकानिमित्त पाठवा खास मेसेज, आप्तेष्टांना द्या शुभेच्छा!
Hartalika 2023 Wishes : हरतालिकेच्या या दिवशी काही कोट्स पाठवूनही या दिवसाचा आनंद तुम्ही द्विगुणित करु शकता. खास संदेशाद्वारे आप्तेष्टांना द्या शुभेच्छा
Hartalika 2023 Wishes : आज 18 सप्टेंबर 2023 हरतालिका तृतीयेचा सण साजरा केला जात आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिकेचे व्रत केले जाते. विवाहित महिलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्रत आहे. भगवान शिवासारखा नवरा मिळावा म्हणून अविवाहित मुलीही या दिवशी निर्जळी व्रत करतात.
विवाहित जोडप्याला दीर्घायुष्याचे वरदान
या दिवशी रात्री जागरण करून शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात आणि विवाहित जोडप्याला दीर्घायुष्याचे वरदान मिळते असे मानले जाते. वैवाहिक जीवनात आनंद येतो. माता पार्वतीनेही भगवान शिवाला आपला पती मिळावा म्हणून हरतालिकेचे व्रत केले. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना, नातेवाईकांना, हितचिंतकांना आणि मित्रांना हरतालिकेच्या शुभेच्छा पाठवतात.
खास संदेशाद्वारे आप्तेष्टांना द्या शुभेच्छा
हरतालिकेची मनोभावे पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत करताना एकमेकांना शुभेच्छा दिल्या, तर व्रत करण्याची प्रेरणा नक्कीच मिळते. तुम्ही या खास संदेश आणि शुभेच्छांद्वारे तुमच्या आप्तेष्टांना हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा देऊ शकता.
तिच्या मनी असे एक आशा, होऊ नये तिची निराशा
सर्व इच्छांची पूर्ती होवो,समृद्धी घेऊन आली हरतालिका
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!
शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
हरतालिकेचे व्रत
प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,
हरतालिका शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक,
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरतालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या सर्व इच्छा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
सण सौभाग्याचा,
पतीवरील प्रेमाचा,
हरतालिका पूजेच्या शुभेच्छा!
उत्सव महिलांच्या श्रद्धेचा
परंपरेचा,
हरतालिकेच्या
सर्व माता-पितांना शुभेच्छा!
हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरतालिकेच्या शुभेच्छा
नाते अतूट, जगती सात पावलांचे
अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे
माता उमाच्या थाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना
मिळो मनाजोगता वर,
हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!
हरतालिकेची मनोभावे पूजा करुन
मिळावा आवडीचा जोडीदार,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका हे व्रत कुमारिका
सुयोग्य वर प्राप्तीसाठी आणि
अखंड सौभाग्यासाठी करतात,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
सौभाग्याची देणं आहे
हरतालिका,
मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
अखंड सौभाग्याचे प्रतीक,
हरतालिका पूजन,
चला करुया साजरा हा दिवस
हरतालिकेच्या शुभेच्छा!
देवी पार्वती तुमच्या आयुष्यात आणो सुख आणि शांती
सर्वांना मिळू दे सुयोग्य पती
हरतालिकेच्या शुभेच्छा!
जय देवी हरतालिके|सखी पार्वती अंबिके
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिकेच्या या दिवशी काही कोट्स पाठवूनही या दिवसाचा आनंद तुम्ही द्विगुणित करु शकता.
पतीला मिळावे दीर्घायुष्य
म्हणून करावे हरतालिका
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिकेचे व्रत करुन तुमच्या आयुष्यात
येवो आनंदी आनंद
हरतालिका शुभेच्छा!
वातावरणात गारवा आहे,
आनंदी आनंद झाला आहे,
हरतालिकेच्या या दिवशी,
प्रेमाचा दिवस आला आहे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक,
सौभाग्य कामनेचे व्रत,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
आला रे आाला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिका सणाच्या शुभेच्छा!
आनंद हरतालिकेचा मनी हा दाटला,
आला सण मांगल्याचा आणि पवित्र अशा हरतालिकेचा
हरतालिका आणू दे जीवनात आमच्या आनंद
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
माता पार्वतीने केले हरतालिका व्रत
म्हणून तिला मिळाले पती स्वरुप शंकर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिकेचा आनंद येऊ देत तुमच्या जीवनात नव चैतन्य
सदैव तुम्हाला मिळो आनंदी आनंद
पार्वतीप्रमाणे व्रत करुन मिळवा
तुमच्या जीवनात आनंदी आनंद
दरवर्षी करा हरतालिका व्रत हे मनोभावे
पार्वतीने केले हरतालिका व्रत मिळावा
तुम्हालाही उमा शंकर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
आनंदी आनंद आला,
हरतालिकेचा सण हा आला,
मिळू दे तुम्हाला पती हा शंकरासारखा
आनंदाचा क्षण हा आला,
हरतालिकेचा क्षण हा आला,
करा मनोभावे पूजा हरतालिकेची
सगळ्यांना मिळू दे मनोभावे पती,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिकेचा आनंद घेऊन येवो तुमच्या जीवनात आनंदी आनंद
करा आज तुम्ही मनोभावे पूजन
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हरतालिका पूजन करुन येऊ देत
जीवनात आनदी आनंद
मिळावा पती शंकरासमान भोळा सुंदर
हरतालिकेच्या शुभेच्छा!
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या
Hartalika 2023 : आज हरतालिका, शिव-पार्वतीकडून मिळेल अखंड सौभाग्याचा आशीर्वाद! शुभ मुहूर्त जाणून घ्या