Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचं मार्चचा दुसरा आठवडा नशीब पालटणार! 3 राशींकडे पैसा येणार, इतर राशींचं भविष्य? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 9 To 15 March 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चचा दुसरा आठवडा मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 9 To 15 March 2026: मार्च महिन्याचा (March 2026) दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 9 ते15 मार्च 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशीबाची साथ मिळू शकते. कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे मार्च महिन्याचा दुसरा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असेल. मंगळाच्या स्थितीमुळे आव्हाने कायम आहेत. शनीचा नकारात्मक प्रभाव दबाव आणत आहे, ज्यामुळे सतत आव्हाने निर्माण होण्याची शक्यता. विरोधक आणि स्पर्धक देखील दबाव आणत आहेत, म्हणून सावधगिरी बाळगा. या आठवड्यात महत्त्वाच्या कामाच्या योजनांवरही परिणाम होऊ शकतो
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फायद्याचा असेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, धनलाभाचे योग आहेत. या काळात तुम्ही अनेक नवीन वस्तू खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त, तुमचे नवीन लोकांशी चांगले आणि फायदेशीर संबंध प्रस्थापित होतील. या काळात तुम्हाला आरामशीर गतीने काम करण्याचा सल्ला दिला जातो
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी हा आठवडा तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, परंतु व्यवहारात सावधगिरी बाळगा. शेवटी व्यवसायात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य समाधानकारक आहे. प्रेम आणि मुलांबाबतही परिस्थिती चांगली आहे. व्यवसायात प्रगती दिसून येईल. काही किरकोळ आरोग्य समस्या कायम राहतील
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाटी नवीन आठवडा थोडा तणावाचा असेल. या आठवड्यात शनीच्या प्रभावामुळे कामावर अधिक प्रयत्न करावे लागू शकतात. याव्यतिरिक्त, या आठवड्यात तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सकारात्मक राहील.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा एखाद्या विशिष्ट कामात यश मिळविण्यासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते, परंतु तुम्हाला निश्चितच यश मिळेल. या काळात, तुमचे नाते अधिक गोड होईल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते देखील सुधारेल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याच्या सुरुवातीला मोठे यश अपेक्षित आहे. कोणत्याही विजय मिळण्याची शक्यता आहे. प्रवास शक्य आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल, परंतु शेवटी काही चिंता निर्माण होऊ शकतात. खर्च वाढू शकतो. तांब्याच्या वस्तू गरजूंना दान करणे फायदेशीर ठरेल.
हेही वाचा>>
Sankashti Chaturthi 2026: आज संकष्टी चतुर्थीला 3 राशींचं भाग्य फळफळलं! ग्रहांचा पॉवरफुल नवपंचम राजयोग बनला, संपत्तीचा मार्ग मोकळा, पैसा, प्रगतीचा वेग दुप्पट
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















