(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandra Grahan 2022 : चंद्रग्रहणात बनतोय अशुभ योग, गर्भवती महिलांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Chandra Grahan 2022 Pregnancy Precautions : चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी काही खास गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. काय सांगितलंय ज्योतिषशास्त्रात?
Chandra Grahan 2022 Pregnancy Precautions : 2022 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच मंगळवारी 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. या दिवशी भारतासह अनेक देशांमध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा परिणाम व्यक्तीवर होतो. ते टाळण्यासाठी ज्योतिषीय उपाय सांगितले जातात. चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी (Pregnant Women) काही खास गोष्टींची विशेष काळजी घ्यावी, अन्यथा या काळात निष्काळजी राहिल्यास बाळाच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
चंद्रग्रहण : गर्भवती महिलांनी काय करावे आणि करू नये?
1. असे मानले जाते की, चंद्रग्रहण गर्भवती महिलांसाठी अशुभ परिणाम देणारा असतो, म्हणून त्यांना ग्रहण काळात घरीच राहण्याचा सल्ला दिला जातो.
2. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी भाजी कापण्यासाठी, कपडे शिवण्यासाठी धारदार साधनांचा वापर टाळावा. त्यामुळे पोटातील बाळामध्ये शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात.
3. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये, स्वयंपाक करू नये
4. ज्योतिषाशास्त्रात असे सांगितले की, ग्रहणाचे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी गर्भवती महिलेने जिभेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुतीचा पाठ करावा.
5. यादरम्यान देव मंत्रांचा जप केल्याने ग्रहणाच्या दुष्परिणामांपासूनही बचाव होतो.
6. ग्रहण संपल्यानंतर, गर्भवती महिलेने पवित्र पाण्याने स्नान करावे, अन्यथा तिच्या बाळाला त्वचा रोग होण्याची शक्यता असते.
7. चंद्रग्रहण काळात मंत्रजपाचे खूप महत्त्व आहे. यावेळी गर्भवती महिला मंत्रोच्चार करून स्वतःचे रक्षण करू शकतात. याचा स्वतःच्या आणि न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला आणि सकारात्मक परिणाम होतो.
चंद्रग्रहणाची वेळ आणि सुतक काळ
2022 वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भारताच्या वेळेनुसार 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:32 ते संध्याकाळी 7:27 पर्यंत असेल, जे भारतात देखील दिसेल. 8 नोव्हेंबर रोजी, हे चंद्रग्रहण भारतात संध्याकाळी 5.32 वाजता दिसेल आणि संध्याकाळी 6.18 वाजता संपेल. त्याचा सुतक काळ भारतात वैध असेल. या चंद्रग्रहणाच्या काळात ग्रहांच्या स्थितीमुळे अनेक विध्वंसक योग तयार होतील, ज्याचा देशावर तसेच राशींवर अशुभ प्रभाव पडेल. ग्रहण काळात ही खबरदारी घेतल्यास तुम्ही त्याच्या प्रभावापासून मुक्त व्हाल.
चंद्रग्रहणाच्या वेळी बनणारा योगायोग अत्यंत अशुभ
ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहणाच्या दिवशी मंगळ, शनि, सूर्य आणि राहू समोरासमोर असतील. दुसरीकडे, भारताच्या कुंडलीत, तूळ राशीवर सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्राचा संयोग तयार होत आहे. याशिवाय कुंभ राशीतील पाचव्या भावात शनि आणि मिथुन राशीतील नवव्या भावात मंगळाचा संयोग विनाशकारी योग निर्माण करत आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी तयार झालेला हा योगायोग अत्यंत अशुभ आहे
चंद्रग्रहणाचा प्रभाव
चंद्र हा मन-मेंदू, माता आणि पदार्थ यांचा कारक मानला जातो. चंद्रग्रहणाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. असे मानले जाते की चंद्रग्रहणाच्या वेळी एखाद्याला खूप वेदना सहन कराव्या लागतात, ज्यामुळे ते अशुभ परिणाम देते. या काळात तुम्हाला आरोग्य आणि पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्वाच्या बातम्या
Tulsi Vivah 2022 : 'या' खास दगडाच्या पूजेने घरात नांदेल सुख-समृद्धी, जाणून घ्या महत्त्व आणि विधी...