Chanakya Niti : या' 3 परिस्थिती ठरतात दुर्दैवाचे लक्षण, व्यक्तीला भोगावे लागतात कष्ट, चाणक्य म्हणतात...
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा तीन परिस्थितींचे वर्णन केले आहे, ज्या मानवासाठी अत्यंत क्लेशदायक व घातक आहेत.
Chanakya Niti : नशीब आणि दुर्दैव हा जीवनाचा भाग आहे. असे म्हटले जाते की, तुमचे नशीब किंवा दुर्दैवामागे तुमचे विचार आणि वागणूक जबाबदार असते. आचार्य चाणक्य यांनीही आपल्या नीतिशास्त्रात अशा तीन परिस्थितींचे वर्णन केले आहे, ज्या मानवासाठी अत्यंत क्लेशदायक व घातक आहेत. जीवनात जेव्हा या तीन परिस्थिती येतात, तेव्हा समजावे की नशिबाची साथ मिळत नाही. चाणक्याच्या मते अशा परिस्थितीत संयम सोडू नये.
वृद्धापकाळात जोडीदाराची गरज
चाणक्यांनी श्लोकात सांगितले आहे की, जर एखाद्या वृद्ध स्त्री किंवा पुरुषाचा जीवनसाथी मरण पावला तर हे त्याच्यासाठी सर्वात मोठे दुर्दैव आहे. कारण वृद्धापकाळात त्या व्यक्तीला आपल्या जीवनसाथीची सर्वात जास्त गरज असते. तारुण्यात जोडीदाराच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न करता येतं, पण म्हातारपणी एकटेपणामुळे आयुष्य खूप वेदनादायी होतं.
वृद्धकाले मृता भार्या बन्धुहस्ते गतं धनम्।
भोजनं च पराधीनं त्रय: पुंसां विडम्बना:।।
वाईट माणसाकडे पैसे जाणे
चाणक्यच्या मते, जर स्वत: कमावलेला पैसा तुमच्या शत्रू किंवा वाईट व्यक्तीच्या हातात गेला, तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या रोजीरोटीवर होतो. शत्रूच्या हातात पैसा गेला तर तो तुमच्याविरुद्ध वापरू शकतो.
परक्याच्या घरात राहणे
इतरांवर अवलंबून राहिल्याने आपण कमजोर होतो. अशा परिस्थितीत परक्याच्या घरात किंवा गुलाम म्हणून राहणे ही सुद्धा दुर्दैवाची गोष्ट आहे. इतरांवर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःच्या इच्छा मारणे, कारण परक्याच्या घरात राहणे माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेते. छोटंसं घर असलं तरी आपल्या घरात राहणं ही भाग्याची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :