(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chanakya Niti: सिंह म्हणून जन्माला आलात सिंहासारख जगायला शिका..! चाणक्य म्हणतात,जंगलाच्या राजाकडून शिका 'या'चार गोष्टी, मिळेल घवघवीत यश
Chanakya Niti: जंगलाचा राजा असणाऱ्या सिंहाकडून कोणते गुण घ्यावे या विषयी जाणून घेणार आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, सिंहासारखे धैर्य असणाऱ्याकडे आणि पूर्णपणे प्रयत्न करणाऱ्याकडेच भरपूर संपत्ती येते.
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी समाजाला सभ्य बनवण्यासाठी नीती ग्रंथ ‘चाणक्य नीती’मध्ये (Chanakya Niti) अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्याला जीवनाचे मार्गदर्शन करतात. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे. अनेक वेळा मेहनत करूनही कोणत्याही कामात यश मिळत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते, काही प्राण्यांच्या गुणांपासून शिकून व्यक्ती जीवनात यश मिळवू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्ञान कुठूनही घेता येते. आतापर्यंत आपण गाढव, कावळा, कुत्रा यांच्याकडून माणसाने कोणते गुण घ्यावे या विषयी जाणून घेतले. आज आपण जंगलाचा राजा अर्थात सिंह (Lion) असणाऱ्या सिंहाकडून कोणते गुण घ्यावे या विषयी जाणून घेणार आहे. आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीच्या सहाव्या अध्यायात याविषयी सांगितले आहे.
लहानपणापासून आपण सिंहाच्या अनेक गोष्टी वाचल्या किंवा ऐकल्या आहेत. शौर्य, पराक्रमाविषयी सांगितले आहे. बोलता बोलता सहज आपण बोलतो की, शंभर वर्ष शेळी होवून जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगा ... याचाच अर्थ असा की, सिंहाचे हे गुण आत्मसात करा जेणेकरून तुम्हाला यशाचा, मान सन्मानाचा मंत्र गवसेल. चाणक्य नीती सांगते की, या हिणवल्या जाणाऱ्या गाढवाच्या तीन गोष्टी जीवनात आत्मसात केल्या तर अपयश तुमच्या जवळपास देखील येणार आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, सिंहासारखे धैर्य असणाऱ्याकडे आणि पूर्णपणे प्रयत्न करणाऱ्याकडेच भरपूर संपत्ती येते. त्यामुळे, सिंहासारखे रुबाबदार, आत्मविश्वासू बना.
प्रभूतंकार्यमल्पंवातन्नरः कर्तुमिच्छति।
सर्वारंभेणतत्कार्यं सिंहादेकंप्रचक्षते॥
एकाग्रतेने काम करा
आचार्य चाणक्यांनी चाणक्यनीतीच्या सहाव्या अध्यायात यशाचा मंत्र दिला आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, सिंह आपल्या शिकारसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. जसा सिंह शिकारीवर त्याप्रमाणे आपण आपल्या निश्चित केलेले लक्ष्य पूर्ण होण्यासाठी झोकून द्या, ध्यानी-मनी-स्वप्नी त्याचाच विचार करत राहणे आणि हाती घेतलेले काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एकाग्रतेच्या जोरावरच आपल्याला उत्तम यश संपादन करता येते.
कठोर परिश्रम
कठोर परिश्रम केल्यास तुम्ही हवं ते मिळवू शकता, असं आपल्याला लहानपणापासूनच सांगण्यात येते. हेच परिश्रम तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आचार्य चाणक्य सांगतात की , जंगलाचा राजा सिंह आपल्याला हवी ती शिकार मिळवण्यासाठी आपली सर्व ताकद लावतो आणि आपली शिकार मिळवण्यात यशस्वी होतो. त्याप्रमाणे व्यक्तीने जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकणे कष्ट करण्याची गरज आहे. कठोर परिश्रमाशिवाय आयुष्यात काहीच साध्य होत नाही त्यामुळे आळस झटका आणि कामाला लागा.
वेळेवर काम करा
आपल्याला मोठे यश मिळवायचे असेल तर छोटी असू किंवा मोठी कोणतीही गोष्ट वेळेवर करणे आवश्यक आहे. काही व्यक्ती कोणतीही काम आजचे उद्यावर ढकलत असतो.अशा व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही.चाणक्य नितीनुसार, वेळेत काम करणारा व्यक्तीच आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहचतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपली कामे वेळेवर करा. काम हे वेळेतच केले पाहिजे. वेळेवर काम केल्याने तुम्हाला यश मिळेल.
आत्मविश्वासू बना
सिंहाकडून सर्वात घेण्यासारखा गुण म्हणजे सिंहासारखे धैर्य असणाऱ्याकडे आणि पूर्णपणे प्रयत्न करणाऱ्याकडेच भरपूर संपत्ती येते. त्यामुळे, सिंहासारखे रुबाबदार, आत्मविश्वासू बना. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण असणे अपेक्षित आहे. जे आत्मविश्वास दाखवतात त्यांना एकापेक्षा जास्त संधी मिळतात आणि ते पुढे जातात आणि ज्यांच्यात आत्मविश्वास नसतो त्यांना ते होते तिथेच राहावे लागते त्यामुळे आत्मविश्वासू बना.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :