Chanakya Niti: गाढवाला जे उमजलं ते आपल्याला नाही कळलं; चाणक्यांनी सांगितले गाढवाकडून शिका 'या' तीन गोष्टी, अपयश कधीच येणार नाही!
Chanakya Niti: मतिमंद, मूर्ख किंवा चेष्टा असं काहीही कुणाला चिटकवायचं असलं की आपण त्याला 'गाढव कुठचा' असं म्हणतो. पण चाणक्य नीती सांगते की, या हिणवल्या जाणाऱ्या गाढवाच्या तीन गोष्टी जीवनात आत्मसात केल्या तर अपयश तुमच्या जवळपास देखील येणार आहे.
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी समाजाला सभ्य बनवण्यासाठी नीती ग्रंथ ‘चाणक्य नीती’मध्ये (Chanakya Niti) अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्याला जीवनाचे मार्गदर्शन करतात. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे. अनेक वेळा मेहनत करूनही कोणत्याही कामात यश मिळत नाही. आचार्य चाणक्य यांच्या मते, काही प्राण्यांच्या गुणांपासून शिकून व्यक्ती जीवनात यश मिळवू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्ञान कुठूनही घेता येते. काही प्राणी-पक्ष्यांचे गुणही माणसाला शिकता येतात. असाच एक प्राणी आहे तो म्हणजे गाढव (Donkey) ...गाढवावरून वरात काढेन तुझी! असं म्हटलं तर किती अपमानास्पद वाटतं ना... मतिमंद, मूर्ख किंवा चेष्टा असं काहीही कुणाला चिटकवायचं असलं की आपण त्याला 'गाढव कुठचा' असं म्हणतो. पण चाणक्य नीती सांगते की, या हिणवल्या जाणाऱ्या गाढवाच्या तीन गोष्टी जीवनात आत्मसात केल्या तर अपयश तुमच्या जवळपास देखील येणार आहे.
सुश्रान्तोऽपि वहेद् भारं शीतोष्णं न पश्यति।
सन्तुष्टश्चरतो नित्यं त्रीणि शिक्षेच्च गर्दभात्॥
परिस्थितीशी जुळवून घ्या
कडाक्याच्या उन्हात आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीत देखील गाढव खंबीरपणे उभे राहून प्रत्येक परिस्थितीत काम पूर्ण करते. त्याचप्रमाणे माणसाने प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने सामना केला पाहिजे. यशाच्या मार्गात अनेक अडथळे येतील पण त्यांना घाबरू नका. चाणक्य म्हणतात की, आयुष्यात येणाऱ्या समस्या आपल्यात लपलेल्या क्षमता वाढवण्याचे काम करतात, त्यामुळे कठीण प्रसंगाला घाबरू नका.
आळस झटका, जोमाने काम करा
आळस हा माणसाचा शत्रू आह. आपण शाळेत असल्यापासून हे ऐकत आहे. चाणक्य सांगतात की, आळस हा माणसाला अपयशाच्या जवळ घेऊन जातो. गाढव कधीही त्याच्या कामात आळस करत नाही. कितीही थकले तरी ते आपले काम पूर्ण करते. त्याचप्रमाणे तुम्ही देखील जोपर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत आपल्या ध्येयपूर्तीसाठी झपाटून काम केले पाहिजे. कोणतेही काम करताना ते एकाग्रतेने पूर्ण करावे. काम करताना कोणताही हलगर्जीपणा करू नये. यश तुम्हाला नक्की मिळेल.
समाधानी राहा
सुखी आणि आनंदी होण्याची आपल्या सगळ्यांची धडपड असते. किंबहुना आनंद आणि शांती मिळवण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते. आयुष्यात माणसाने जीवनातील प्रत्येक परिस्थिती स्वीकारून समाधानी राहावे. चाणक्य सांगतात की, आनंदी राहणे हा एक असा दागिना आहे जो आपण विकत न घेता घालू शकतो. आनंदी जीवन जगण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी मनाचे समाधान आवश्यक आहे. जर तुम्ही समाधानी असाल तर तुमच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहील. चाणक्यच्या मते, जो व्यक्ती मनाने संतुष्ट असेल तो प्रत्येक परीक्षेत आपल्या बुद्धीने आणि संयमाने यशस्वी होतो. स्पर्धेचा भाग बनू नका. लोभ तुमच्यावर मात करू देऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
Mercury Transit: बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे वाढणार अडचणी; 'या' राशींचा वाईट काळ सुरु होण्याची शक्यता