Chaitra Purnima 2024 : चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका 'ही' कामं; होतील विपरीत परिणाम
Chaitra Purnima 2024 Date : चैत्र पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पौर्णिमा तिथी ही भगवान सत्यनारायणाला समर्पित आहे. या दिवशी काही गोष्टी करणं वर्जित आहे, अन्यथा याचे वाईट परिणाम व्यक्तीला भोगावे लागतात.
Chaitra Pournima 2024 : चैत्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा (Chaitra Pournima 2024) म्हणतात. चैत्र हा हिंदू वर्षाचा पहिला महिना आहे, त्यामुळे ही पौर्णिमा देखील वर्षातील पहिली पौर्णिमा असते. या दिवशी भगवान विष्णू आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते. या दिवशी हनुमान जयंतीही साजरी केली जाते.
चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ्य दिलं जातं. यावेळी चैत्र पौर्णिमा 23 एप्रिलला आहे. या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य मिळतं. या दिवसाशी संबंधित काही विशेष नियम आहेत. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी अजिबात करु नये, त्या नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करू नका
- या दिवशी चुकूनही जास्त वेळ झोपू नये. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. पौर्णिमेच्या दिवशी दान आणि दक्षिणा देण्याला विशेष महत्त्व आहे.
- चैत्र पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र असतो. या दिवशी चुकूनही तामसिक भोजन, मांसाहार, मद्य आदींचं सेवन करू नये. असं मानलं जातं की, या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्याने मनावर नकारात्मक परिणाम होतो, जीवनात नकारात्मकता येते. त्यामुळे या दिवशी सात्विक अन्न खावं.
- चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आचरण शुद्ध ठेवावं. या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरू नयेत. असं मानलं जातं की, यामुळे चंद्र देव क्रोधित होतो.
- पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडू नये. तुळशीची पानं भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत, परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं अशुभ मानलं जातं आणि असं केल्यास भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळत नाही.
- पौराणिक मान्यतेनुसार, पौर्णिमेच्या रात्री दह्याचं सेवन करू नये. यामुळे चंद्र दोष निर्माण होतो आणि आर्थिक नुकसानीसह जीवनात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. रात्री दही खाल्ल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या देखील निर्माण होतात.
- पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो. पौर्णिमेच्या रात्री तो त्याच्या परिपूर्ण कलांनी संपन्न होतो, अशी मान्यता आहे. अशा स्थितीत पौर्णिमेच्या दिवशी असं कोणतंही काम करणं टाळावं ज्यामुळे चंद्रदोष होऊ शकतो.
- चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मन शांत ठेवावं. राग, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर ठेवावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Dev : हनुमानाची पूजा करणाऱ्यांना शनि का त्रास देत नाही? जाणून घ्या खरं कारण