एक्स्प्लोर

Chaitra Navratri 2024 : आज नवरात्रीची सहावी माळ! 'या' राशींसाठी आजचा दिवस शुभ; वाचा 12 राशींचं राशीभविष्य

Chaitra Navratri 2024 Horoscope Today : आज सकाळी 11:44 पर्यंत षष्ठी तिथी पुन्हा सप्तमी तिथी असेल. आज दिवसभर आर्द्रा नक्षत्र राहील.

Chaitra Navratri 2024 Horoscope Today : ज्योतिष शास्त्रानुसार, आज 14 एप्रिल 2024,रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) सहावा दिवस. त्यानुसार, आज सकाळी 11:44 पर्यंत षष्ठी तिथी पुन्हा सप्तमी तिथी असेल. आज दिवसभर आर्द्रा नक्षत्र राहील. सकाळी 10:15 ते सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत राहुकाळ राहील त्यानुसार इतर राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास 

व्यवसाय - आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन ओळख मिळेल. उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी निर्माण होतील. 

नोकरी - आज कामाच्या संदर्भात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तसेच बॉसबरोबर बाहेर जाण्याचा योग आहे. 

विद्यार्थी - विद्यार्थ्यांना आज काही संकटांचा सामना करावा लागू शकतो. नवीन पिढीने कोणत्याही कामासाठी अतिविश्वास दाखवू नये. 

लव्ह लाईफ - आज तुम्हाला जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. हा काळ अगदी सुखाचा जाईल. 

वृषभ रास 

व्यवसाय - वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनिअर या लोकांच्या बिझनेसमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. 

नोकरी - तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. कामात वरिष्ठांची मदत घ्या. 

आरोग्य - आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. छोटा त्रास जरी झाला तरी डॉक्टरांची भेट घ्या. 

विद्यार्थी - शिक्षणात तुमची प्रगती, परफॉर्मन्स चांगला आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. 

मिथुन रास 

व्यवसाय - आज इतर व्यवसायिकांशी डील करताना सावधानता बाळगा. कोणालाही तुमचा गैरफायदा घ्यायला देऊ नका. 

नोकरी - नोकरीत तुमच्या बढतीची शक्यता आहे. आहे त्यापेक्षा जास्त मेहनतीने काम करा. यश नक्की मिळेल. 

प्रेमसंबंध - जे प्रेमी युगुल आहेत किंवा वैवाहिक जोडीदार त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात सुखाचा काळ असणार आहे. 

कुटुंब - आज तुम्हाला कुटुंबियांच्या बरोबर नातेवाईकांकडे जाण्याचा योग येऊ शकतो. 

कर्क रास 

व्यवसाय - व्यवसायातील उतार-चढावामुळे तुम्हाला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागेल. विरोधकांवरही लक्ष ठेवा. 

नोकरी - कामाच्या ठिकाणी अचानक तुमची पोस्ट बदलल्यामुळे तुम्हाला तमाव जाणवू शकतो. जास्त मेहनतीने काम करा. 

प्रेमसंबंध - जोडीदाराबरोबर विनाकारण कोणत्याही गोष्टीवरून वाद घालू नका. 

विद्यार्थी - विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत कठीण असणार आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. 

सिंह रास 

व्यवसाय - ज्यांना नव्याने व्यवसाय सुरु करायचा आहे ते आजपासून सुरु करू शकतात. हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. 

नोकरी - नोकरीत तुम्हाला चांगलं यश मिळेल. अधिक चांगलं काम करण्यासाठी तुमचा उत्साह वाढेल. 

आरोग्य - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आज किंचित डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागेल. 

कुटुंब - कुटुंबातील सदस्यांच्या आजारपणामुळ तुम्हाला चिंता वाटेल. 

कन्या रास 

व्यवसाय - जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरु करणार असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. 

नोकरी - तुमची नोकरीत लवकरच बदली होऊ शकते. या बदलासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहा. 

कुटुंब - आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील व्यक्तींबरोबर धार्मिक स्थळाला भेट द्या. 

विद्यार्थी - विद्यार्थ्यांचा सध्या सुट्टीचा काळ सुरु आहे. अनेक नवीन गोष्टी अनुभवायला शिका. 

तूळ रास 

व्यवसाय - जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर सकाळी 10.15 ते 12.15 आणि दुपारी 2.00 ते 3.00 या वेळेत करा. हा काळ चांगला आहे.  

नोकरी - काम करणाऱ्या व्यक्तीने नशिबावर विसंबून राहू नये, त्याला त्याच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी स्वत:चा मार्ग शोधावा लागेल.

आरोग्य - आरोग्याच्या दृष्टीकोनातून तुमचा दिवस अनुकूल असेल. तुमचे आरोग्य सुधारेल. 

लव्ह लाईफ - प्रेम आणि जोडीदारामधील गैरसमज दूर करून तुमच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस येतील. 

वृश्चिक रास 

व्यवसाय - जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला आज सावधगिरीने काम करावं लागेल. कारण तुमच्या छोट्या चुकीची नंतर मोठी शिक्षा तुम्हाला भोगावी लागू शकते.  

नोकरी - जे बरोजगार आहेत त्यांनी आज नोकरीसाठी प्रयत्न करावेत. तुम्हाला नोकरी मिळण्याची संकेत आहेत.  

विद्यार्थी - विद्यार्थयांनी आज पालकांशी वाद घालू नये. चुकीच्या गोष्टीसाठी विनाकारण हट्ट करू नये.  

कुटुंब - कुटुंबात मालमत्तेबाबत वाद होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या जीवनशैलीत योग आणि ध्यान यांचा समावेश करा

धनु रास 

व्यवसाय - नेटवर्क आणि संपर्कांद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायाची निव्वळ संपत्ती वाढवण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा विचार करा, हा बदल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

नोकरी - जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी उत्तम आहे. 

कुटुंब - कुटुंबियांबरोबर शांततेत वेळ घालवाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

विद्यार्थी - आज नवीन गोष्टी अनुभवण्याची तुम्हाला संधी मिळेल. चांगल्या योजना आखा. 

मकर रास 

व्यवसायिक - व्यावसायिकांनी छोट्या गुंतवणुकीऐवजी मोठी दीर्घकालीन गुंतवणूक करावी. त्यातून तुम्हाला जास्त लाभ मिळेल. 

नोकरी - कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्ही एम्प्लॉय ऑफ द मंथ पुरस्काराच्या शर्यतीत अव्वल असाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला मेहनतीच्या जोरावर यश आणि कीर्ती मिळवण्याची संधी मिळेल.

कुटुंब - कुटुंबातील आई-वडिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल, वडिलधाऱ्यांच्या बाबतीत ढवळाढवळ करणे टाळा.

प्रेमसंबंध -  तुम्हाला प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही बदलांना सामोरे जावे लागेल. एखाद्या खास व्यक्तीसोबत सहलीसाठी बनवलेले बेत बदलू शकतात. 

कुंभ रास 

व्यवसाय - व्यवसायात आर्थिक लाभ होईल. परदेशी कंपनीत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे.

नोकरी - कामाच्या ठिकाणी तुम्हाला हळूहळू काम करण्याची सवय असेल तर ती बदला. अन्यथा इतरांच्या तुलनेत मागे राहाल.  

कुटुंब - तुम्हाला कुटुंबात काही समस्यांना सामोरे जावे लागेल, परंतु हळूहळू त्या दूर होतील. आपल्या प्रेम आणि जोडीदाराशी एकनिष्ठ रहा. अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

विद्यार्थी - नवीन पिढीचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे ते सर्व कामे करण्यात यशस्वी होतील. अतिगंड योग तयार केल्याने तुम्हाला सामाजिक स्तरावर चांगले परिणाम मिळतील. 

मीन रास 

व्यवसाय - व्यवसायात पैशाचे चुकीचे व्यवस्थापन तुमच्या चिंता वाढवतील. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. 

नोकरी - बेरोजगार व्यक्तीला नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशाला सामोरे जावे लागेल. पण तुम्ही तुमचे प्रयत्न कमी करू नका.

विद्यार्थी - नवीन पिढीने आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा तसेच शिक्षकांचा आदर केला पाहिजे. त्यांचे मार्गदर्शन तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल. 

आरोग्य - बदलत्या वातावरणामुळे आज तुम्हाला थोडीशी कणकणी जाणवू शकते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Horoscope Today 14 April 2024 : आजचा दिवस खास! 'या' राशींवर राहणार खंडेरायाची कृपा; चौफेर धनलाभाचे संकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget