Horoscope Today 14 April 2024 : आजचा दिवस खास! 'या' राशींवर राहणार खंडेरायाची कृपा; चौफेर धनलाभाचे संकेत
Horoscope Today 14 April 2024 : चैत्र महिन्याचा सहावा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो.
Horoscope Today 14 April 2024 : पंचांगानुसार, आज 14 एप्रिल 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा सहावा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास
शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवणे. नोकरीमध्ये तुमच्या स्वतंत्र विचारामुळे वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ रास
कोणतेही आर्थिक निर्णय तडकाफडकी घेऊ नयेत. संततीच्या तऱ्हेवाईक वागण्याने मतभेद संभवतात.
मिथुन रास
आतापर्यंत केलेल्या चुका विसरल्या तरी त्याची कारणे मात्र विसरू नका हा ग्रहांचा तुम्हाला संदेश आहे. महिलांनी अति एकांगी विचार करू नये.
कर्क रास
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना स्वतःच्या मताप्रमाणे काम करता येईल. महिला उत्साही बनतील.
सिंह रास
आध्यात्मिक साधनेची आवड असणाऱ्यांना आज उत्तम साधना करता येईल. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल.
कन्या रास
तुमच्या आत्मविश्वासाला तुमच्याच आळशीपणामुळे तडा जाण्याची शक्यता. जुन्या आजारांना बळी पडाल.
तूळ रास
आज पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी थोडे जास्तच कष्ट पडतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात.
वृश्चिक रास
तुमच्यात मूळचाच असलेला जोश वाढेल. काही संकेत तुमच्या मनाला मिळतील. महिलांनी अति एकांगी विचार करू नये.
धनु रास
नोकरी व्यवसायात एखाद्या गोष्टीसाठी झपाटून जाल. काही गूढ घटना घडण्याची शक्यता. महिलांना आपले छंद जोपासण्याची संधी मिळेल.
मकर रास
संततीच्या व्रात्यपणामुळे जेरीस याल. एखाद्याचा तिरस्कार किंवा अपमान मनात खोलवर राहील आणि त्याचे पडसाद तुमच्या वागणुकीवर दिसतील.
कुंभ रास
रागाला आवर घाला. कलाकार लोकांना योग्य संधी चालून येतील. जुन्या अनुभवातून नाविन्य जन्म घेईल. तुमच्या आत्मविश्वासाला तुमच्याच आळशीपणामुळे तडा जाण्याची शक्यता. जुन्या आजारांना बळी पडाल.
मीन रास
कलाकारांच्या हातून चांगल्या कलाकृती निर्माण होतील. स्त्री वर्गाकडून दुःख पदरात पडण्याची शक्यता असल्यामुळे सावधान राहा.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: