Astrology : आज रवि आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा जुळून आला शुभ योग; मिथुनसह 'या' 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
Astrology Yog Panchang 5 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Yog Panchang 5 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 5 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारचा दिवस आहे. आजच्या दिवशी शुक्र आणि गुरुच्या राशी परिवर्तन योगाबरोबरच (Yog) बुधादित्य आणि उभयचरी योगाचा दुर्लभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. तसेच, आज कृतिका नक्षत्राचा शुभ प्रभाव देखील दिसणार आहे. त्यामुळे इतर राशींसाठी आजचा दिवस मंगलमय असणार आहे. आज सर्वार्थ सिद्धी योगासह रवि योगसुद्धा जुळून आला आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. तसेच, तुम्हाला प्रत्येक कार्यात चांगलं यश मिळेल. नशिबाची तुमच्याबरोबर चांगली साथ असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला एखादी चांगली शुभवार्ता मिळू शकते. तसेच, आज तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुम्ही पैशांची गुंतवणूक करु शकता. तसेच, तुम्हाला सरकारी योजनांचा चांगला लाभ मिळेल. भावा-बहिणींबरोबर तुमचं नातं चांगलं असेल. आज कोणाशीही पैशांचा व्यवहार मात्र करु नका. तसेच, विद्यार्थ्यांना शालेय जीवनात अनेक नवीन गोष्टी शिकता येतील. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज दिवसभरात अचानक तुम्हाला धनलाभ होईल. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. आज तुमच्या नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. त्यामुळे तुम्हाला फार प्रसन्न वाटेल. मित्रांचा सहवास लाभेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, तुम्ही जर मेहनत केली तरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. मेहनतीशिवाय यशाची अपेक्षा करु नका. तसेच, स्वत:ची तुलना कधीच इतरांशी करु नका. यामुळे तुम्हीच खचून जाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज समाजात तुमचा मान-सन्मान चांगला वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा देखील चांगला विस्तार होईल. पार्टनरबरोबर तुम्ही मनमोकळेपणाने संवाद साधाल. तर, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 5 February 2025 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? कोणाला मिळणार लाभ? वाचा आजचे राशीभविष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
