(Source: Poll of Polls)
Astrology : आज धन योगासह जुळून आले उत्तम संयोग; कुंभसह 'या' 5 राशींच्या नशिबाचे दार उघडणार, लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसाच पैसा
Astrology Panchang Yog 17 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 17 June 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 17 जूनचा दिवस आहे. आजच्या दिवशी भक्त हनुमान मंदिरात (Lord Hanuman) जाऊन भगवान हनुमानाची पूजा करतात. तसेच, आजच्या दिवशी मंगळ ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केला आहे. तसेच, चंद्राने कुंभ राशीत संक्रमण केलं आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी खास शुभ योगांची (Yog) निर्मिती झाली आहे. यामध्ये धन योग, शतभिषा नक्षत्र आणि प्रीति योगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे आजचा दिवस अनेक राशींसाठी फार खास असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. आज निर्माण झालेल्या धन योगामुळे तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील. तसेच, तुमची करिअरची गाडी देखील पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आहे. आज समाजातील काही प्रभावशाली लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे तुमच्या ज्ञानात चांगली भर पडलेली दिसेल. तुमचं वैवाहिक जीवन फार सुरळीत चालेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांना आज आपल्या मेहनतीचं फळ मिळेल. अनेक दिवासांपासून तुम्ही ज्या प्रोजेक्टची वाट पाहात होतात त्यावर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच, तुम्हाला मानसिक सुख-शांती मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमचा चांगला वावर पाहायला मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज चंद्र तुमच्या भाग्य राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं साहस आणि प्रेम दिसून येईल. तसेच, तुमची प्रॉपर्टीच्या संदर्भातील तुमची सगळी कामे पूर्ण होतील. तुम्हाला संपत्तीचा लाभ घेता येईल. तसेच, तुम्हाला दिलेलं वचन पाळाल. तुमच्या कामात तुमची प्रगती दिसून येईल.
कुंभ रास (Aquaris Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस उमेदीचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना तुमच्या कामाकडून फार अपेक्षा असतील. त्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल घडून येतील. तुमच्या बौद्धिक क्षमतेला चांगला वाव मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















