एक्स्प्लोर

Astrology : आज मालव्य योगासह बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना अनपेक्षित लाभ, प्रगतीच्या संधी येणार चालून

Panchang 29 September 2024 : आज रविवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी साध्य योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 29 September 2024 : आज रविवार, 29 सप्टेंबर रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे आणि शुक्र त्याच्या मूळ तूळ राशीत असल्यामुळे मालव्य राजयोग (Malavya Rajyog) निर्माण होणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी द्वादशी श्राद्ध केलं जाईल. श्राद्ध पक्षाच्या बाराव्या दिवशी मालव्य राजयोगासोबत साध्य योग आणि मघा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini Horoscope)

आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि ते स्वतःसाठी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसाठी ऑनलाईन शॉपिंग करू शकतात. याशिवाय आज घरी श्राद्ध विधीही आयोजित केला जाऊ शकतो, यामुळे घरातील महिला खूप व्यस्त दिसतील. आज रविवारच्या सुट्टीचा फायदा व्यावसायिकांना मिळेल, तुमचा जो माल अनेक दिवसांपासून पडलेला आहे, त्याची आज अचानक विक्री होईल, ज्यामुळे तुमच्या नफ्याचा मार्ग मोकळा होईल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात प्रेम आणि विश्वासार्हता अनुभवता येईल. घरातील महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही मित्रांची मदत घेऊ शकता.

सिंह रास (Leo Horoscope)

आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा आज सूर्यदेवाच्या कृपेने पूर्ण होतील, जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. आज तुमच्यामध्ये उत्साह पाहायला मिळेल. कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. वैवाहिक जीवनात काही वाद चालू असतील तर ते आज संभाषणातून सोडवले जातील. व्यवसाय करणाऱ्यांना आज त्यांच्या क्षेत्रात चांगला नफा मिळेल आणि पैशामुळे रखडलेली कामं पूर्ण होतील. तुमच्या वडिलांच्या मदतीने आज तुम्हाला काही जमीन आणि मालमत्तेत गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. तुम्ही संध्याकाळ मुलांसोबत हसत खेळत आणि मस्करी करण्यात घालवाल.

तूळ रास (Libra Horoscope)

आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात सुरु असलेला तणाव हळूहळू सूर्यदेवाच्या कृपेने दूर होईल. आज तुमच्या घरी तुमच्या पूर्वजांसाठी श्राद्ध विधी आयोजित केला जाऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य पूर्ण सहकार्य करतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही समस्यांना सामोरं जावं लागेल, त्या सोडवण्यासाठी त्यांना शिक्षकांच्या मदतीची गरज असेल. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर आज तुम्हाला नफा मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. रविवारच्या सुट्टीमुळे आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला पूर्ण वेळ द्याल.

धनु रास (Sagittarius Horoscope)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद तुम्हाला त्रास देत असेल तर आज वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीने तो सोडवला जाऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल. आज तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला फायदे देखील मिळतील. आज व्यावसायिक त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण स्पर्धा देतील, ज्यामुळे तुम्हाला मोठा नफाही मिळेल. रविवारच्या सुट्टीमुळे आज घरात लहान मुलांचा खूप गोंगाट असेल. संध्याकाळचा वेळ मित्रांशी बोलण्यात जाईल.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. कुंभ राशीच्या लोकांना मित्र आणि प्रियजनांच्या मदतीने आज घरगुती कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. जे लोक प्रेम जीवनात आहेत ते आज रात्री बाहेर जेवण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्याचा विचार करू शकतात. अविवाहित लोकांना लग्नाचा चांगला प्रस्ताव येऊ शकतो. सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला आज अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि समाजात तुमचा मानही वाढेल. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 29 September 2024 : आज 'या' राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा; आरोग्याला मिळणार उभारी, वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार, पुरातत्व विभागाकडून जीर्णोध्दाराचे काम  सुरू, पहा
तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार, पुरातत्व विभागाकडून जीर्णोध्दाराचे काम सुरू, पहा
Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंना नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
शिवसेनेला नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
Ind vs Aus: सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
Pune Accident Update: नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaSachin Kharat :  संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याने परभणी बंदची हाकChandrashekhar Bawankule Meet Eknath Shinde एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  11 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार, पुरातत्व विभागाकडून जीर्णोध्दाराचे काम  सुरू, पहा
तुळजाभवानी मंदिराला प्राचीन गतवैभव परत मिळणार, पुरातत्व विभागाकडून जीर्णोध्दाराचे काम सुरू, पहा
Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदेंना नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
शिवसेनेला नगरविकास खात्यासह एकूण 13 मंत्रिपदं; ठाण्यातील बैठकीला फडणवीस फोनवरुन कनेक्ट, नेमकं काय-काय घडलं?
Ind vs Aus: सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
सराव सत्रात रोहित शर्माने सर्वांना आश्चर्यचकीत केले; तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाची ब्लू प्रिंट आली समोर
Pune Accident Update: नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
नाकाबंदीसाठी तैनात महिला कॉन्स्टेबलला उडवलं, फरफटत नेलं, फरार मोटरचालकास अटक
Kurla Bus Accident: अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
अपघातानंतर चालक संजय मोरे ढसाढसा रडायला लागला, संतप्त जमावाच्या तावडीतून 'या' व्यक्तीने कसेबसे सोडवले
Maharashtra Winter Temperature drops: नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला, सातपुड्यात दवबिंदू गोठले, घरांवर हिमकणांची चादर
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका, शाळांच्या वेळेत बदल
Maharashtra Cabinet Expansion: महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, नाराजी थोपवण्यासाठी शिवसेनेत फिरती मंत्रिपदे?
Embed widget