Horoscope Today 29 September 2024 : आज 'या' राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा; आरोग्याला मिळणार उभारी, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 29 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 29 September 2024 : पंचांगानुसार, आज 29 सप्टेंबर 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
समोर आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रगती कराल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आज प्रसिद्धी मिळेल, सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे कौतुक होईल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
महिला जोडीदारास उत्तम सहकार्य करतील. मैदानी खेळ खेळणाऱ्यांना आज वेगळी संधी मिळेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
शेरास सव्वाशेर बनाल आणि कौतुकास पात्र ठराल. महिला सतर्क राहतील.
सिंह (Leo Horoscope Today)
बाह्य जीवनात किती स्पर्धांना तोंड द्यावे लागले तरी मनशांती ढळू देऊ नका.
कन्या (Virgo Horoscope Today)
बुद्धीच्या जोरावर धाडस दाखवून प्रत्येक काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न कराल.
तूळ (Libra Horoscope Today)
राजकारणातील व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आज कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये. पैसा खर्च करण्यामध्ये सुद्धा लहरीपणा जाणवेल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
कुठेही धोका पत्करण्याची तयारी ठेवाल. अति महत्त्वाकांक्षा असमाधान निर्माण करेल.
मकर (Capricorn Horoscope Today)
वारसा हक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहेत. कमी श्रमामध्ये जास्त संपत्ती मिळण्याची कला गवसेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो हे लक्षात ठेवून मार्गक्रमणा करा.
मीन (Pisces Horoscope Today)
कामाच्या ठिकाणी उत्तम परस्परसंबंध निर्माण करण्यावर भर द्या.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: