(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Astrology : आज सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ योग; धनुसह 'या' 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा, मिळतील 'हे' संकेत
Astrology Panchang 28 November 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु प्रदोष व्रताचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते.
Astrology Panchang 28 November 2024 : आज 28 नोव्हेंबरचा दिवस फार खास असणार आहे. आज मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी गुरु प्रदोष तिथीचं व्रत देखील करण्यात येणार आहे. आजच्या दिवशी सौभाग्य योग (Yog), शोभन योग आणि चित्रा नक्षत्रासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु प्रदोष व्रताचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. तसेच, ठरवलेलं काम पूर्ण करण्याची संधी मिळेल त्यामुळे या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयता.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुम्ही ठरवलेलं काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. आज दिवसभरात तुम्हाला अनेक शुभ संकेत मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला ते ओळखता यायला हवेत. तुमच्या बिझनेसमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना प्रगतीच्या अनेक संधी धावून येतील. याचा तुम्ही योग्य वेळी लाभ घ्यावा.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्ही तुमच्या मानसिक तणावातून मुक्त व्हाल. तुमचा ओढा धार्मिक कार्याकडे जास्त असेल. तसेच, आजचा दिवस तुमचा कुटुंबियांबरोबर अगदी आनंदात जाणार आहे. जर कोर्ट कचेरीच्या संदर्भात काही समस्या असतील तर त्या लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समृद्धीचा असणार आहे. आज तुम्ही आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण असाल तसेच, भविष्यात तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी धावून येतील. जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने देखील हा काळा फार महत्त्वाचा असणार आहे. आज तुम्हाला ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबात लवकरच शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. तुम्ही एखाद्या प्रकल्पाच्या संदर्भात फार आशावादी असाल. तसेच, तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभ असणार आहे. या संधीचा तुम्ही योग्य तो लाभ घ्यावा.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, नोकरीच्या संदर्भात तुम्हाला अनेक प्रस्ताव येऊ शकतात. भावा-बहिणींबरोबर तुमचे संबंध चांगले असतील. जर तुमचे अनेक दिवसांपासून काम अपुरं राहिलं असेल तर ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या बाबतीत तुम्हाला अनेक संधी मिळतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :