Astrology : आज सफला एकादशीच्या दिवशी जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींवर राहणार विष्णूची कृपादृष्टी, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
Panchang 26 December 2024 : आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार, याच दिवशी वर्षातील शेवटची एकादशी देखील आहे, आजचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी सुकर्म योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे.
Saphala Ekadashi 2024 Panchang : आज गुरुवार, 26 डिसेंबर रोजी चंद्र तूळ राशीत जात असून सूर्य, बुध आणि शुक्र हे ग्रह सूर्याच्या बाजूला असल्यामुळे उभयचारी योग निर्माण होत आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला सफला एकादशीचं व्रत देखील पाळलं जाणार आहे. सफला एकादशीच्या दिवशी उभयचारी योगासह सुकर्म योग आणि स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज धार्मिक कार्यात रुची घेतील. तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात लांबच्या प्रवासाला जावं लागेल, पण ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरदार लोकांना सहकाऱ्यांची मदत होईल. लव्ह लाईफमधील लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, ते आपल्या जोडीदाराची ओळख आपल्या कुटुंबातील सदस्यांना करुन देऊ शकतात. भावा-बहिणींमध्ये वैचारिक मतभेद होत असतील तर आज ते संपतील आणि कुटुंबात पुन्हा सुख-शांती नांदेल. आज तुम्हाला तुमच्या आईसोबत काही नातेवाईकांच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते.
सिंह (Leo Today Horoscope)
आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असेल. सिंह राशीच्या लोकांना भगवान विष्णूच्या कृपेने आज त्यांच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यशही मिळेल. कोणतंही काम नशिबावर सोडू नका, ते कठोर परिश्रमाने पूर्ण करावं लागेल हेही लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांना आज परीक्षेत उत्कृष्ट यश मिळेल, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप आनंद होईल आणि उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल आणि नशीब तुमच्या सोबत असेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
तूळ (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तूळ राशीचे लोक आज पैशाच्या बाबतीत भाग्यवान असतील. आज तुम्हाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध वाटेल आणि बचत देखील करता येईल. आज भगवान विष्णूच्या कृपेने तुम्ही गुंतवणुकीद्वारे चांगले पैसे कमवू शकाल. व्यवसायात मंदी आली असेल तर आज तुम्हाला अशा व्यक्तीची साथ मिळेल, जो तुम्हाला व्यवसायात चांगली प्रगती करण्यास मदत करेल. तुमचं एखादं सरकारी काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असेल, तर आज ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार व्हाल. एकादशीमुळे घरात धार्मिक वातावरण राहील आणि घरी पूजा कार्य घडतील. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल.
मकर (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. मकर राशीचे लोक आज अशा गोष्टींवर पैसे खर्च करतील, ज्यामुळे कुटुंबात सुखसोयी वाढतील. घराला रंगरंगोटी किंवा सजावटीचं काही कामही निघू शकतं. आज तुम्ही भगवान विष्णूच्या कृपेने सर्व प्रकारच्या परिस्थितींना तोंड देऊ शकाल आणि शत्रूंपासूनही मुक्ती मिळवाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना जे काही अडथळे येत होते ते आज शिक्षक आणि वडिलांच्या सहकार्याने दूर होतील. आज तुम्हाला तुमचे पूर्वीचे प्रलंबित काम पूर्ण करावं लागेल, ज्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. नोकरी करणाऱ्यांना कामात अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे ते प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करू शकतील.
कुंभ (Aquarius Today Horoscope)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आज चांगलं राहील आणि आज तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधीही मिळू शकते. तुमचं कोणतंही प्रकरण कोर्टात अडकलं असेल तर आज तुम्हाला त्यात दिलासा मिळेल असं दिसतं. आज काही शत्रू तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही धैर्याने आणि शौर्याने त्यांचा पराभव करण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळेल. व्यावसायिकांना पुरेपूर लाभ मिळू शकतो. नवीन वर्षात मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: