Saphala Ekadashi 2024 : आज अतिशय शुभ योगात जुळून आली सफला एकादशी; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र जाप
Saphala Ekadashi 2024 : सफला एकादशी ही मार्गशीर्ष गुरुवारी आली असल्याने या व्रताचे फायदे अनेक पटींनी वाढले आहेत. या दिवशी उपवास ठेवल्याने, विष्णूंची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
Saphala Ekadashi 2024 Shubh Muhurat Puja Vidhi : एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूला समर्पित एकादशी दर महिन्याला कृष्ण आणि शुक्ल पक्षात येते. यानुसार एका वर्षात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचं स्वतःचं महत्त्व असतं. वर्षातील शेवटच्या एकादशीला सफला एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळतं, तसेच आर्थिक लाभही होतो. या दिवशी तुमची जी काही इच्छा असेल, ती सांगितली तर ती नक्कीच पूर्ण होते. यासाठी सफला एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र आणि इतर माहिती जाणून घेऊया…
सफला एकादशी 2024 कधी? (Saphala Ekadashi 2024 Date)
पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी 25 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वाजता सुरू झाली, जी आज दुपारी 12:45 पर्यंत सुरू राहील.
उदयतिथीनुसार, सफला एकादशीचं व्रत आज, म्हणजेच 26 डिसेंबरला पाळलं जात आहे. आज स्वाती नक्षत्र संध्याकाळी 6.10 पर्यंत राहील. यंदाची एकादशी गुरुवारी आली आहे. अशा स्थितीत या दिवशी पूजा आणि उपवास केल्यास अनेक पटींनी अधिक फळ मिळू शकतं.
सफला एकादशी 2024 पारण वेळ
27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7:10 ते 9:17 पर्यंत तुम्ही उपवास सोडू शकता
सफला एकादशी 2024 पूजा विधी (Saphala Ekadashi Puja Vidhi)
आज ब्रह्म मुहूर्तावर उठून सर्व कामं, अंघोळ वैगरे संपवून स्नान करावं. यानंतर श्री हरी विष्णूचं ध्यान करून व्रताची प्रतिज्ञा करावी. यानंतर भगवान विष्णूची पूजा सुरू करा. सर्व प्रथम एका पाटावर पिवळ्या रंगाचं कापड पसरवा आणि त्यावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवा. यानंतर फुलं, हार, पिवळं चंदन, अक्षत, प्रसाद इत्यादी अर्पण करा आणि नंतर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा. विष्णू चालीसा, विष्णू मंत्रासह व्रताची कथा म्हणा. शेवटी भगवान विष्णूची आरती करावी. दिवसभर उपवास केल्यानंतर द्वादशी तिथीला उपवास सोडावा.
सफला एकादशीला या मंत्रांचा जप करा (Saphala Ekadashi 2024 Mantra)
ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम ह्रीं श्री लक्ष्मीवासुदेवाय नमः
ओम नमो नारायणाय
लक्ष्मी विनायक मंत्र
दंताभये चक्र दारो दधानम्,
कराग्रागस्वर्णघटम त्रिनेत्रम्।
धृतजया लिंगिताम्बाधिपुत्रया
लक्ष्मी गणेश कनकभामिडे।
धन-वैभव मंत्र
ओम भुरिडा भुरी देहीनो,मा दभ्रम भुरया भर. भूरी घेदिंद्र दितासी।
ओम भूरिदा त्यासी श्रुताः पुरुत्र शूर वृत्राहण । आ नो भजस्व राधासी ।
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: