एक्स्प्लोर

Astrology : आज गजकेसरी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; कुंभसह 'या' 5 राशींचं नशीब पालटणार, अचानक धनलाभाचेही संकेत

Panchang 23 May 2024 : आज गुरुवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा लाभ मुख्यत्वे 5 राशींना होणार आहे. या 5 राशींना आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आर्थिक लाभ होईल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 23 May 2024 : आज, गुरुवार, 23 मे रोजी चंद्र वृश्चिक राशीत जाईल, तर बृहस्पति वृषभ राशीत असेल. अशा प्रकारे चंद्र आणि गुरुच्या स्थितीमुळे आज गजकेसरी योग तयार होईल. तसेच आज वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा आहे आणि या तिथीला वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूचा नववा अवतार भगवान बुद्ध यांचा जन्म याच शुभ दिवशी झाला होता.

बुद्ध पौर्णिमेला गजकेसरी योगासह शिवयोग, सिद्ध योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 3 राशींना आज तयार होत असल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? पाहूया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या काही अपूर्ण इच्छा आज पूर्ण होऊ शकतात. आज तुमची अध्यात्मिक बाबींमध्ये रुची वाढेल. आज तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सर्व गरजा पूर्ण करू शकाल. व्यावसायिक भागीदार तुमच्या यशात हातभार लावतील आणि तुम्ही यशस्वी उद्योजक म्हणून तुमची ओळख निर्माण करू शकाल. नोकरीतील लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, त्यामुळे ते आपली कामं वेळेवर पूर्ण करतील आणि सहकाऱ्यांशी तुमचे संबंधही चांगले राहतील. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, तुमचं कुटुंबातील सर्वांशी चांगले संबंध असतील. सासरच्या लोकांशी असलेले वाद मिटतील आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कर्क राशीचे लोक आज आत्मविश्वासाने प्रत्येक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला तुमच्या कामाचा अभिमानही वाटेल. आर्थिक स्थिती अपेक्षेप्रमाणे राहील आणि अडकलेला पैसाही वसूल होईल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असेल. नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. आज व्यापाऱ्यांना मोठा नफा होण्याची शक्यता आहे आणि ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे असतील. नोकरदार लोक त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात, जिथे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं चांगलं राहील आणि तुम्ही एकमेकांना साथ देत काम कराल.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज भगवान विष्णूच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमचं कोणतंही काम अडकलं असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतं. जर तुम्ही बरेच दिवस आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असाल तर आज तुमचं आरोग्य सुधारेल आणि तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. कोणतीही जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल आणि तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं अधिक घट्ट होईल आणि तुम्ही भविष्यासाठी योजनाही बनवाल. आज तुम्हाला भाऊ आणि मित्रांकडून चांगला सल्ला मिळेल, जो फायदेशीर ठरेल.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तूळ राशीचे लोक त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील, तसेच पैशाची बचत करू शकतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मालमत्ता देखील खरेदी करू शकता. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल आणि नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि नशिबाच्या जोरावर तुम्हाला प्रत्येक कामात चांगलं यश मिळेल. आज व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे आणि त्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेत वाढ जाणवेल. अविवाहित लोकांचे नातेसंबंध आज पुढे जातील आणि कुटुंबात लवकरच काही शुभ कार्य घडू शकेल. तुमच्या सभोवतालचं वातावरण चांगलं राहील आणि तुमच्या जीवनात प्रचंड सकारात्मक बदल होतील.

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात रस असेल आणि ते संपूर्ण कुटुंबासह कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल आणि परदेश दौऱ्यावर जाण्याची संधीही मिळू शकते. नशिबाच्या पाठिंब्याने तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि तुम्ही खर्च सहज हाताळू शकाल. आजचा दिवस नोकरदार लोकांसाठी अनुकूल असेल आणि ते कामाच्या ठिकाणी आपल्या कामात चमकदार कामगिरी करतील. आज तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. तुमचे भावा-बहिणींसोबतचे संबंध चांगले राहतील आणि ते तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण होईल आणि ते उच्च शिक्षणासाठी परदेशातही जातील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला 'या' 3 राशींवर राहणार शनीची विशेष कृपा; श्रीमंतीसह भौतिक सुखात होणार वाढ, पुढचा काळ आनंदीआनंदाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget