एक्स्प्लोर

Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ योग; 'या' 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, करिअर गाठणार नवी उंची

Panchang 16 July 2024 : आज मंगळवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मिथुनसह 5 राशींवर आज बजरंगबलीची विशेष कृपा राहील, आजचा दिवस लाभाचा असेल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 16 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज मंगळवार, 16 जुलै रोजी चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असल्याने या दिवशी साध्ययोग, रवियोग, शुभ योग आणि विशाखा नक्षत्राचा शुभ योग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. यानुसार आज कोणत्या 5 राशींना नशिबाची सर्वाधिक साथ मिळणार? जाणून घेऊया

मिथुन रास (Gemini)

आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. आज हनुमानाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांच्या सर्व चिंता दूर होतील आणि गुंतवणुकीसाठीही दिवस चांगला आहे. जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला दिलासा मिळेल आणि सरकारी कामंही कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. नोकरदार लोकांच्या कामाचं त्यांच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकेल आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यातही ते यशस्वी होतील. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झालं तर, जोडीदारासोबतचं नातं मजबूत राहील आणि दोघेही एकमेकांना समजून घेऊन काम करतील. 

कर्क रास (Cancer)

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज नवीन यश मिळेल आणि त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहील. अविवाहित लोक आज मनात असलेल्या व्यक्तीला प्रपोज करून नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. व्यापारी आपलं कौशल्य दाखवून चांगला नफा कमावतील आणि आपला व्यवसाय पुढे नेतील. नोकरीतील लोक आज आपले ध्येय साध्य करतील आणि अधिकारीही तुमचं कौतुक करताना दिसतील. तुम्ही अध्यात्मिक बाबींमध्ये अधिक रस दाखवाल आणि धर्मादाय कार्यात काही पैसे खर्च करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होण्याची चिन्हं आहेत. 

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना नशिबाने साथ दिल्यास त्यांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील आणि ते चांगले पैसे कमवण्यातही यशस्वी होतील. एकाग्रतेसह विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची क्षमता आज सुधारेल, ज्यामुळे ते शिक्षणात चांगली कामगिरी करतील. नोकरदार लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती होईल आणि इतर कंपनीकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर येऊ शकते. 

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळेल आणि कोणाकडून तरी अडकलेले पैसे मिळतील. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळेल. नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना कामाच्या ठिकाणी आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कल्पनांचंही कौतुक होईल. मोठ्यांच्या सल्ल्याने आणि आशीर्वादाने तुमची अनेक कामं पूर्ण होतील.

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज वडिलोपार्जित मालमत्तेचा आणि पैशाच्या इतर अनपेक्षित स्त्रोतांचा फायदा होऊ शकतो आणि ते मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकतात. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील आणि शिक्षकांचंही सहकार्य मिळेल. तुमची प्रलंबित कामंही आज सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस शुभ असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 16 July 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharmila Thackeray On Uddhav Thackeray:  राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharmila Thackeray On Uddhav Thackeray:  राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Thackeray Vs Shinde Rada: मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा
मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Embed widget